आपला जिल्हा

ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत श्री.म्‍हसोबा महाराजांचा अभिषेक करत यात्रोत्‍सव साजरा

 ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत श्री.म्‍हसोबा महाराजांचा अभिषेक करत यात्रोत्‍सव साजरा

ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत श्री.म्‍हसोबा महाराजांचा अभिषेक करत यात्रोत्‍सव साजरा

लोणी विजय कापसे दि.४ डिसेंबर २०२५लोणी बुद्रूक गावचे ग्रामदैवत श्री.म्‍हसोबा महाराजांचा यात्रोत्‍सवाची सुरुवात जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत महाअभिषेक करुन करण्‍यात आली. परंपरेने हा यात्रोत्‍सव भक्‍तीमय वातावरणात साजरा करण्‍यासाठी ग्रामस्‍थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

जाहिरात

गेली अनेक वर्षे या यात्रेची परंपरा ग्रामस्‍थांनी एकत्रित येवून जोपासली आहे. श्री.दत्‍त जयंतीच्‍या दिवशीच श्री. म्‍हसोबा महराजांचा यात्रोत्‍सव साजरा करण्‍याची प्रथा आहे. यंदाही यात्रेच्‍या निमित्‍ताने लोणी बुद्रूक गावामध्‍ये चैतन्‍य निर्माण झाले असून, यात्रेच्‍या निमित्‍ताने सांस्‍कृतीक कार्यक्रम, कुस्‍त्‍यांचा फड तसेच भव्‍य अशी काठीची मिरवणूक काढण्‍यात येणार आहे.

जाहिरात

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत श्री.म्‍हसोबा महाराजांचा अभिषेक करुन, महापुजा करण्‍यात आली. याप्रसंगी माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, सौ.धनश्री विखे पाटील यांच्‍यासह ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

जाहिरात

यात्रेच्‍या निमित्‍ताने राज्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारे देवस्‍थान म्‍हणून, या तिर्थक्षेत्राची ओळख आहे. मंत्री विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून या देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्‍धता करुन देण्‍यात आली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे