आपला जिल्हा

अमृतवाहिनी सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला २२ लाखांचे पॅकेज.

अमृतवाहिनी सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला २२ लाखांचे पॅकेज.

 

शैक्षणिक – सांस्कृतिक जपानी भाषा केंद्र ‘सकुरा’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरक

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि ४ डिसेंबर २०२५अमृतवाहिनी अभियांत्रिकी मधील जपानी भाषा केंद्र सकुरा हे विद्यार्थ्यांच्या जपानी भाषा शिकण्यासाठी आणि तेथील सांस्कृतिक माहिती शिकण्यासाठी प्रेरक ठरत आहे. आतापर्यंत N5, N4 व N3 पातळ्यांवर विद्यार्थ्यांनी यशस्वी सर्टिफिकेशन्स मिळवले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक यांच्या प्लेसमेंटमुळे मिळणाऱ्या समाधानासाठी  अमृतवाहिनी सदैव कटिबद्ध असून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यलयातील सिव्हिल इंजिनीरिंगच्या विध्यार्थ्याला तब्बल 22 लाखांचे पॅकेज मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ.एम.ए. वेंकटेश यांनी दिली.

जाहिरात

जपान येथील टोकियो शहरात असणाऱ्या आय.डी.होम जपान या नामांकित इन्फ्रास्ट्रक्टर कंपनी मध्ये सिव्हिल इंजिनीरिंग च्या अतुल भीमा कुटे याची निवड झाली असून सुमारे २२ लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सकुरा जपानी भाषा व सांस्कृतिक केंद्र स्थापन केल्याने विद्यार्थ्यांना जागतिक तसेच जपानी भाषेतील संधी बद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. जपानी भाषेचे N5, N4  व N3 स्तरापर्यंत प्रशिक्षण देणारे हे केंद्र विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी निर्माण करते. या केंद्रांतर्गत सर्व शाखांमधील विद्यार्थी जपानी भाषा शिकून जपानी कंपन्यांशी संवाद उद्योगनुरूप कार्यशाळा आणि प्लेसमेंटसाठी आवश्यक उपक्रमांमध्ये भाग घेतात. जपानी भाषा प्रमाणित विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मध्ये विशेष प्राधान्य दिले जाते.आतापर्यंत अमृतवाहिनी मधून 350 विद्यार्थी जपानी भाषा प्रमाणित झाली असून 50 विद्यार्थी जपानमध्ये, ओएस टेक्नॉलॉजी अशा विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

जाहिरात

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने सातत्याने उपक्रमशील शिक्षण दिले आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यशाळा, परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन या माध्यमातून विधार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित केली आहे. सिव्हिल इंजिनीरिंग विभागाने मूल्यवर्धित अभ्यासक्रम आणि सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यक्रमातून अनेक विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नियुक्त केले आहेत.

या सर्व प्रयत्नातून अतुल कुटे ह्या विद्यार्थ्याप्रमाणे यश मिळत आहे. यासाठी करिअर डेव्हलपमेंट सेलचे प्रा.प्रवीण वाकचौरे, सिव्हील विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा.निलेश खैरनार प्रयत्नशील आहेत.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ.सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त सौ.शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव,प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी.वाघे, सिव्हील इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ.एस.बी.कांडेकर यांनी अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे