आपला जिल्हा

शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंचा मदतीचा हात अहिल्यानगरसाठी दिली वाहन सुविधा

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ डिसेंबर २०२५– कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीसाठी आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी सिव्हिल हॉस्पिटलअहिल्यानगर येथे जाण्याकरिता आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांगत्व प्रमाणपत्र, UDID कार्डआरोग्य तपासणी नोंदीदिव्यांग सहाय्यक साधनांसाठी लागणारे पात्रता अहवालतसेच शालेय शिष्यवृत्ती अर्जांसाठी आवश्यक वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्र अशा अनेक कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोपरगाव ते अहिल्यानगर प्रवास करताना वाहतुकीच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. दिव्यांगाना घेऊन पालकांना प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणींचा गांभीर्याने विचार करून आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

जाहिरात

यावेळी डॉ.जितेंद्र रणदिवेडॉ.सपना भंडारीमाजी नगरसेवक रमेश गवळीफकीरमामू कुरेशीराजेंद्र वाकचौरेसुनिल शिलेदारशिवाजीराव खांडेकरतुषार गलांडेइम्तियाजभाई अत्तारसोमना आढावसंतोष शेलारमनोज नरोडेअमित आगलावेसुनिल फंडवैभव कानडेदादा नाईकवाडेविजय त्रिभुवनजनार्दन कदमशुभम काळेमुकुंद भूतडाअर्जुन मरसाळेराजेंद्र उशिरेअनिरुद्ध काळेसुवर्णा मगर मॅडमराजेंद्र पाखरकांतीलाल गुरसळसचिन म्हस्केराणी रोडे आदींसह दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

जाहिरात

          यामुळे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत दिव्यांग संदर्भीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोपे होणार असून कागदपत्र प्रक्रिया अधिक गतीमान होणार आहे. हॉस्पिटलमध्ये आजच्या दिवसासाठी विशेष दिव्यांग काउंटरची व्यवस्था करण्यात आली असून तज्ञ डॉक्टरफिजिओथेरपिस्टनेत्रतज्ञश्रवणतज्ञ आणि मानसोपचार तज्ञ विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांची दिव्यांगत्व प्रमाणपत्रे तातडीने तयार करण्यात येणार असून शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि विशेष शिक्षणासाठी आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणीही होणार आहे.

          त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या सोयीनुसार जाऊ शकत नाही व त्याला त्याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अडचणी येवू शकतात ही अडचण लक्षात घेवून आ. आशुतोष काळे यांनी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेवून मतदार संघातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोपरगाव येथुन अहिल्यानगरला जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे ७० दिव्यांग विद्यार्थ्यांसह १४० व्यक्तींना वाहन व्यवस्था उपलब्ध करुन दिली असुन त्यांची अडचणी दुर करून पालकांचा आर्थिक भार आ.आशुतोष काळे यांनी कमी केला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे