आपला जिल्हा

मर्चंट बँकेच्या वक्तव्यावरून” कोयटेंच्या दांभिकतेवर सातभाईंची धारदार टीका

मर्चंट बँकेच्या वक्तव्यावरून” कोयटेंच्या दांभिकतेवर सातभाईंची धारदार टीका

मर्चंट बँकेच्या वक्तव्यावरून” कोयटेंच्या दांभिकतेवर सातभाईंची धारदार टीका

कोपरगाव विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२५: मर्चंट बँकेबाबत काकासाहेब कोयटे यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी शालीत गुंडाळून जोडे मारावेत, अशा शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शब्दांची आडवाट न धरता, थेट मुद्द्यावर बोट ठेवत सातभाईंनी कोयटे यांच्या राजकीय दांभिकतेचा समाचार घेतला.

“वस्तुस्थिती तपासण्याची तसदी न घेता, केवळ राजकीय आकसापोटी संस्थांवर चिखलफेक करणे ही कोपरगावच्या राजकारणाची पातळी खालावणारी बाब आहे,” असे सांगत सातभाईंनी पहिल्याच वाक्यात कोयटे यांच्या वक्तव्याचा फुगा फोडला. मर्चंट बँक ही लहान व्यापारी, कष्टकरी व सर्वसामान्यांना आर्थिक आधार देणारी संस्था असल्याचे ठामपणे सांगत, चुका झाल्या असतील तर चर्चा व्हायला हवी; मात्र स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे हा राजकीय स्वार्थ असल्याचा टोला त्यांनी लगावला.

जाहिरात

“ज्यांनी स्वतःच्या पतसंस्थेत नावाखाली व्यापारी धोरण अवलंबून मोठ्या कर्जदारांची फौज उभी केली आणि त्या थकीत कर्जांच्या वसुलीची एक वेगळीच पद्धत सुरु केली, त्यांनी आज इतरांच्या प्रयत्नांवर बोट दाखवणे म्हणजे हास्यपद आहे,” असा मिश्किल टोला सातभाई यांनी काकासाहेब कोयटे यांना लगावला.

आम्ही मर्चंट बँकेच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना उभे करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडुन काही चुका झालेल्या आहे, तर त्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्याची किंमतही आज मोजत आहोत; मात्र कर्ज वसुलीच्या नावाखाली सक्ती करून कोणाची इज्जत चव्हाटायावर आणली नाही, असा ठाम दावा सातभाईंनी केला. आजही कर्जदार आणि ठेवीदार, सभासद आमच्या पाठीशी उभे आहेत, हेच आमच्या प्रामाणिकतेचे खरे प्रमाणपत्र आहे,” असे ते म्हणाले.

जाहिरात

काही कर्जदारांनी तुमच्या संस्थेच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या म्हणुन आपण त्यामुळेच मर्चंट बँकेवर आरोपांची धुळफेक केली असा थेट आरोप करत सातभाईंनी केला, “आधी स्वतःचा आरसा बघा, मग इतरांवर टीका करा,” असा सल्ला दिला.

मर्चंट बँकेविषयी खोटी माहिती पसरवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न कोपरगावचा सुज्ञ मतदार नक्कीच हाणून पाडतील, असा विश्वास सातभाईंनी व्यक्त केला.

जाहिरात

बँका यशस्वी कर्जदारांची नावे जाहीर करून प्रेरणा देतात; पण काकासाहेब कोयटे तुम्ही थकीत कर्जदारांची ‘टॉप टेन’ यादी प्रसिद्ध करून थकीत वसुलीच्या नावाखाली त्या कर्जदारांची पत घालवण्याचा प्रयत्न करतात. हा आर्थिक शिस्तीचा मार्ग नाही, त्याला तुम्ही पाप- पुण्याचा मुलांमा देता ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

सहकारातील ही मानसिकता चुकीची आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या परिवारातील एका घटक एका मोठ्या बँकेचा थकबाकीदार असतानाही इतरांना वसुली बाबत नैतिकतेचे धडे देणे चुकीचे आहे.
काकासाहेब राजकारणात हार जीत होत असते 2001 साली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जसा तुमचा पराभव झाला तसा माझाही पराभव झाला होता त्यानंतर गेली 25 वर्षे आपण राजकारणातुन बाजुला झाला होता, पण आम्ही आमची जनतेप्रती असणारी सामाजीक व राजकीय बांधलकी कधीही सोडली नाही, मी व माझा परीवार समाजकारणात व राजकारणात आजही पाय रोवुन उभे आहोत, आता माझी वयोमानाप्रमाणे शाररीक क्षमता कमी झाली त्यामुळे मी माझ्या बांधलकीचा वारसा पुढच्या पिढीला सोपावला आहे, काकासाहेब आपण सुद्धा असेच करायला पाहिजे होते असे मला वाटते. परंतु आपण स्वत: या राजकारणाच्या रणंगणात बाशिंग बांधुन का उतरले आहेत हे माझ्या सह सर्व कोपरगांव शहरातील जनतेला अजुनही समजलेले नाही

संजय सातभाई

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे