प्रभाग ५ चा चेहरा मोहरा बदलणार- शोभा घायतडकर व अमित आगलावे
प्रभाग ५ चा चेहरा मोहरा बदलणार- शोभा घायतडकर व अमित आगलावे
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२५– कोपरगाव नगरपालिकेचा प्रचार अंतिम टप्यात आला असून उद्या शनिवार दि २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून कोपरगाव नगरपालिका करिता आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी ओमप्रकाश तथा काका कोयटे उमेदवारी करत आहे तर कोपरगाव शहरातील ३६०० मतदार असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील (अंबिका नगर,शारदानगर, कालिका नगर, वडांगळे वस्ती, येवला रोड, कालिंदी नगर, अन्नपूर्णा नगर, गरिमा नगरी, एसएसजीएम कॉलेज परिसर, पशु पैदास केंद्र, के बी पी विद्यालय परिसर) सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेल्या शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे हे अत्यंत दमदार उमेदवार असून प्रचारात देखील त्यांनी वेग घेतल्याचे पहावयास मिळत आहे.
जाहिरात
शोभा घायतडकर या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल अशोक घायतडकर यांच्या आई तर डॉ. भाग्यश्री घायतडकर यांच्या सासूबाई आहे. डॉ घायतडकर परिवार नेहमीच सामाजिक, धार्मिक, कामात आग्रेसर परिवार म्हणून सर्व परिचित आहे. डॉ.घायतडकर दांपत्य आपल्या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल तसेच अशोकराव घायतडकर सेवाभावी ट्रस्ट यांच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिरे राबवत असतात तसेच आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधत मोफत आरोग्य तपासणी उपचार तर वृक्षारोपण मोहीम राबवतात. गणपती व नवरात्र उत्सव देखील अभिनव उपक्रमाने ते साजरे करत असतात.डॉ कुणाल घायतडकर यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत प्रभागातील अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावले आहे तर शोभा घायतडकर या देखील प्रभागातील सामाजिक धार्मिक कार्यात हिररीने सहभाग घेत असतात त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहे.जाहिरात
तर अमित आगलावे हे तरुण, तडफदार, युवा नेतृत्व आहे. नियमित गोरगरिबांच्या सुखदुःखाला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची अनोखी ओळख सर्व कोपरगाव शहरात आहे. तर ते नेहमी समाजासाठी झटत असतात. प्रभागातील प्रत्येक मतदारांसोबत त्यांचा एक वेगळेच ऋणानुबंध जोडला गेलेला आहे.त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक काम केलेली आहे. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे हे अत्यंत दमदार उमेदवार दिल्याची चर्चा सर्व प्रभागात जोर धरू लागली आहे. या जोडीने प्रचारात देखील मोठी आघाडी घेतली आहे.
आमदार आशुतोष काळे गटाकडून उमेदवारी करत असलेले प्रभाग क्रमांक ५ मधील शोभा अशोक घायतडकर व अमित चंद्रकांत आगलावे यांना जनतेने काम करण्याची संधी दिली तर त्या संधीचे सोन करत आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने आपल्या प्रभाग क्रमांक ५ चा संपूर्ण कायापालट चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास मतदारांना दिला आहे.