आपला जिल्हा

कोपरगाव शहराला समृद्ध विकसित शहर करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- काका कोयटे

कोपरगाव शहराला समृद्ध विकसित शहर करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- काका कोयटे

कोपरगाव शहराला समृद्ध विकसित शहर करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध- काका कोयटे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२५आपल्या कोपरगाव शहराला राज्यात सर्वात समृद्ध सुंदर आणि एक नंबर विकसित शहर आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी मी नगराध्यक्ष म्हणून व माझे ३० नगरसेवक सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी मतदारांना विश्वास देताना व्यक्त केला.

जाहिरात
 आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिकेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगाव तहसील मैदानात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि १७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला पुरुष मतदार उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोपरगाव शहराला हजारो वर्षाच्या कलेसोबत प्राचीन पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभला असून गुरु शुक्राचार्य यांची नगरी तर प्रभू रामचंद्र सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एकेकाळी गुळाची पंढरी म्हणून संबोधले जाणारे कोपरगाव विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि हीच विकासाची घोडदौड आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने यापुढे देखील दुप्पट वेगाने धावणार असल्याचे प्रतिपादन काका कोयटे यांनी या कार्यक्रमात कोपरगाव शहरातील उपस्थित असलेल्या मतदारांना कोपरगाव शहर समृद्ध करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असेल व राहणार असा विश्वास दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे