आपला जिल्हा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व


संगमनेर विजय कापसे दि २१ डिसेंबर २०२५– राजकारण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत अशी ओळख असणाऱ्या संगमनेर तालुक्याने आपली झालेली चूक दुरुस्त करत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून सेवा समितीच्या 27 उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. याचबरोबर राज्यातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे ठरल्या आहेत. यामुळे संगमनेर हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.








