आपला जिल्हा

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ६ विद्यार्थ्यांची फॉक्स सोल्युशन्स कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ६ विद्यार्थ्यांची फॉक्स सोल्युशन्स कंपनीत नोकरीसाठी निवड


उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे संजीवनीच्या प्लेसमेंटचा वाढता आलेख

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २४ डिसेंबर २०२५: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामळे उद्योगाभिमुख शिक्षणावर अधिकचा भर दिला जातो. याच जोडीला संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाकडून कंपनी निहाय मुलाखतींची तयारी करून घेतल्या जाते. याचा परीपाक म्हणुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या  नामांकित कंपन्यांमधिल नोकऱ्यांचा  आलेख सातत्याने वाढत आहे. अलिकडेच फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांना हवे असलेल्या सहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करून त्यांच्या हातात आकर्षक वार्षिक  पॅकेजचे नेमणुक पत्र दिले आहे, अशी  माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

पत्रकात पुढे म्हटले आहे की फॉक्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या अभियांत्रिकी, ऑटोमेशन आणि आयटी सोल्युशन्स आणि सेवा कंपनीने बी.टेक कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील  वरूण सुनिल भोजणे याची तर बी.टेक इंलेक्ट्रिकल इंजिअिरींगच्या अंतिम वर्षातील साईप्रसाद उत्तम गोसावी, साई दिलीप पवार, तेजस किरण सोनवणे, आदित्य संदीप चांदर व तेजस विजय शेटे यांनी निवड केली आहे.

जाहिरात

संजीवनीमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने  नियमितपणे तांत्रिक प्रशिक्षण , व्यक्तिमत्व विकास, मुलाखत मार्गदर्शन  तसेच औद्योगीक तज्ञांचे मार्गदर्शन  दिल्या जाते. यामुळे विविध कंपन्यांच्या कसोटीत येथिल विद्यार्थी उतरत असुन पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची टीम व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे, तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे