कबड्डी क्षेत्राला नवे बळ : विवेक कोल्हे राज्य उपाध्यक्षपदी विराजमान
कबड्डी क्षेत्राला नवे बळ : विवेक कोल्हे राज्य उपाध्यक्षपदी विराजमान
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२५–ॲमेचर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी युवा नेते विवेक कोल्हे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. खेळ, संघटन आणि नेतृत्व यांचा प्रभावी समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या विवेक कोल्हे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.
जाहिरात
सन २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य ॲमेचर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून, याच कालावधीत कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड कबड्डी चळवळीला बळ देणारी ठरणार आहे.
जाहिरात
विवेक कोल्हे हे नेहमीच युवक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांशी जोडलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी, त्यांच्यातील गुणवत्ता राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ आता कबड्डी क्षेत्रालाही होणार आहे. या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातील होतकरू खेळाडूंना योग्य व्यासपीठ, प्रशिक्षण, स्पर्धात्मक संधी आणि संघटनात्मक पाठबळ देण्यासाठी ठोस धोरणे राबविली जातील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
कबड्डी हा मातीशी नाळ जोडणारा खेळ असून, या खेळातून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कबड्डी खेळ नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास क्रीडा वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.