अँड.नितीन पोळ

विश्वकर्मा योजनेत मातंग समाजाचा समावेश करण्यात यावा – ॲड. नितीन पोळ

विश्वकर्मा योजनेत मातंग समाजाचा समावेश करण्यात यावा – ॲड. नितीन पोळ

विश्वकर्मा योजनेत मातंग समाजाचा समावेश करण्यात यावा – ॲड. नितीन पोळ

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ सप्टेंबर २०२४– विविध पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना पी एम विश्वकर्मा योजना लागू करण्यात आली मात्र अनेक ठिकाणी मातंग समाज हा अजूनही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करून उपजीविका करत असताना देखील या योजनेत मातंग समाजातील व्यावसायिकांचा समावेश नाही. त्यामुळे पी एम विश्वकर्मा योजनेत मातंग समाजातील कारागिरांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड नितीन पोळ यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

जाहिरात

आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने बारा बलुतेदार यांच्या करिता पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना कारागिरासाठी पी एम विश्वकर्मा योजना जाहीर केली असुन या योजनेतून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना एक लाख रुपये अर्थ साहाय्य केले जाणार आहे त्या वर ५%व्याज आकारण्यात येणार असुन सदर रक्कम १८ महिन्यांत परतफेड करावयाची आहे सदर व्यवसायाचे पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या व्यवसायासाठी टूल किट खरेदी साठी अतिरिक्त पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे. या योजनेत सुतार, लोहार, सोनार, कुंभार, न्हावी, माळी, धोबी चर्मकार विणकर, कुलूप बनवणारे आदी कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे मात्र मातंग समाजातील अनेक कारागीर केरसुणी, दोरखंड आदी व्यवसाय करतात त्याच प्रमाणे मातंग समाजातील पोट जात असलेल्या गारुडी समाजा तील लोक म्हैश व शेळ्या पालनाचा व्यवसाय करतात मात्र दुर्दैवाने या योजनेत मातंग समाज व त्या संबधित व्यवसायाचा कऱण्यात आलेला नाही.तरी शासनाने या योजनेत मातंग समाजातील कारागिरांचा समवेश कऱण्यात यावा अशी मागणी केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे