एस.जी विद्यालयाच्या साई कुलकर्णीची स्कॉलरशिप परीक्षेत गगन भरारी

एस.जी विद्यालयाच्या साई कुलकर्णीची स्कॉलरशिप परीक्षेत गगन भरारी

कोपरगाव विजय कापसे दि ६ जानेवारी २०२६– नाशिक येथिल बी.पी.पाटील जुनियर कॉलेज आणि दै.पुढारी वृत्तपत्र माध्यमाच्या संयुक्त विद्यमाने ए.पी.जे. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी तालुका स्तरीय स्पर्धा परीक्षा १४ डिसेंबर रोजी विद्यालयात पार पडली. या परीक्षेत सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांमधून विद्यालयाचा साई नारायण कुलकर्णी हा तालुक्यात प्रथम आला असुन त्याला ५१ हजार ची स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी असणाऱ्या बीपी पाटील जुनिअर कॉलेज मध्ये आयोजित या स्पर्धेत अहिल्यानगर व नाशिक दोन्ही जिल्हातुन एकूण ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या मध्ये देखिल श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचा विद्यार्थी कु.साई नारायण कुलकर्णी हा द्वितीय आला असुन त्याला १२१००० रु इतकी स्कॉलरशिप मिळाली.






