शासकीय विभागीय जीत कुणे दो व टेबल सॉकर स्पर्धेत कोपरगावच्या २४ खेळाडूची राज्यस्तरीय निवड
शासकीय विभागीय जीत कुणे दो व टेबल सॉकर स्पर्धेत कोपरगावच्या २४ खेळाडूची राज्यस्तरीय निवड
या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याकडून प्राध्यापक सुदर्शन पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली३० स्पर्धक जिल्हासरीय स्पर्धेत प्रथम येऊन त्यांनी विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

यात कोपरगाव तालुक्यातील २४ स्पर्धकांनी आप – आपल्या वय आणि वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तर संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या ८ स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यात वैभव दिघे, धीरज गायकवाड, ओम पोटे, पवन आरोटे, कुणाल कलवर, अर्जुन ढोकणे, जयेश महाले आणि खुशल सदगीर यांचा समावेश आहे. तर शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ८ स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यात सरस ठोळे, आदर्श भगत, हर्ष लंगोटे, अर्णव पानगव्हाणे, अपेक्षा भगत, रिद्धी शिंदे, तीर्था निकम , शिवकन्या घोरपडे यांचा समावेश आहे.तसेच राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महर्षी विद्यालयातील ३ स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यात ज्ञानदा सोनवणे , आदित्य सांगळे आणि मृण्मय मंडलिक यांचा समावेश आहे.कोळपेवाडी येथील छ. शिवाजी विद्यालयातील सार्थक मुरडणर हा प्रथम आला. राधाबाई काळे कन्या विद्यालयातील अर्पिता आहेर ही प्रथम आली. के.जे.सोमय्या कॉलेजची सप्तमी डहारे ही प्रथम आली, भगचंद माणिकचंद ठोळे शाळेतील श्रवण शिंदे प्रथम आला. डी पॉल शाळेतील हर्ष धनवटे प्रथम आला.अशा तालुक्यातील विविध शाळा आणि कॉलेजच्या २४ स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हे यश संपादन केले.





