आपला जिल्हा

आशिया  खंडातील सर्वात मोठ्या  स्पर्धेत संजीवनीची नेत्रदिपक कामगिरी

आशिया  खंडातील सर्वात मोठ्या  स्पर्धेत संजीवनीची नेत्रदिपक कामगिरी

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल व अकॅडमीने जिंकली आयआयटी बॉम्बे आयोजीत ८४ हजारांची बक्षिसे – डॉ. मनाली कोल्हे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२६आयआयटीने (पवई)  आयोजित केलेल्या राष्ट्रीय टेकफेस्ट स्पर्धेत शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कुल आणि कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमीच्या बाल तंत्रज्ञांनी तब्बल ८४ हजार रूपयांच्या बक्षीसांची लयलुट केली. आशिया खंडातील सर्वात मोठी तंत्रज्ञान विषयक स्पर्धा असा या स्पर्धेचा लौकीक आहे.   या राष्ट्रीय स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी  चांगले यश  प्राप्त केल्याने या दोन्ही शाळांची गणना टॉप टेक्स स्कूल ऑफ इंडिया अशी झाली.  संजीवनीच्या दृष्टीने हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशी प्रतिक्रीया संजीवनी ग्रुप ऑफ  स्कुल्स च्या संचालिका डाॅ. मनाली अमित  कोल्हे यांनी व्यक्त केली. डाॅ.कोल्हे म्हणाल्या, या स्पर्धेत देशभरातील एक हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत स्पर्धाकरीत संजीवनीच्या बाल तंत्रज्ञांनी हे यश संपादन केले. संजीवनीतून मिळत असलेले तांत्रिक शिक्षण आणि  बुध्दिचातुर्याच्या जोरावर त्यांनी हि किमया साध्य केली.  रोख रकमे सोबतच प्रशस्तीपत्रके व स्मृतिचिन्हे देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मागील दोन वर्षांपूर्वी  अनुक्रमे ७५ हजार रूपये व  मागील  ८०  हजार रूपये रकमेची बक्षिसे मिळविली होती. या वर्षी त्याहून अधिक चांगली कामगीरी करून संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी हॅट्रीक साधली.    

जाहिरात

                                                         
     अल्टीमेट मेझ स्पर्धा प्रकारात राजविका अमित कोल्हे, जय तरूण भुसारी, साई गणेश  सिनगर व नील विकास काटे यांच्या टीमने रू १० हजाराचे प्रथम बक्षिस जिंकले. इंटरनॅशनल फुल थ्रोटल स्पर्धेत शिवांश  सुमित कोल्हे, पार्थ अनिल पवार व देवांग तुषार  जमदाडे यांच्या संघाने रू २० हजाराचे प्रथम बक्षिस मिळविले. रोबोप्रिसिझन स्पर्धेत अथर्व पंकज बुब, रोहित प्रेम दादवाणी व चैतन्य मुकूंद डहाळे यांच्या टीमने रू १० हजाराचे प्रथम बक्षिस मिळविले. रोबोस्प्रिंट ज्युनिअर स्पर्धेत सार्थक उमेश  पवार, शौर्य  अमितकुमार कलगुंडे, अद्वैत नितीन उराडे व रूद्र रायभान बावके यांनी उत्कृष्ट  कामगिरी करत द्वीतिय क्रमांकाचे रू ८ हजाराचे बक्षिस जिंकले. साहुल सारंग पाटील, रघुनाथ विनोद लोंगाणी ध्रुव राजु पोरांडला व साईश  रविंद्र बऱ्हाटे  यांच्या टीमने अल्टीमेट मेझ स्पर्धा प्रकारात रू ८ हजारांचे बक्षिस जिंकले. तसेच इंटरनॅशनल फुल थ्रोटल स्पर्धेत नील विकास काटे, जय तरूण भुसारी व अर्णव प्रदिप औताडे यांनी द्वीतिय क्रमांक मिळवत रू ८ हजारांचे बक्षिस मिळविले.

जाहिरात

      तसेच अन्य विद्यार्थ्यांनी विविध वर्गवारीमध्ये प्रत्येकी रू १ हजाराचे बक्षिस मिळविले. कंसात वर्गवारी. राजविका अमित कोल्हे, जय तरूण भुसारी, नील विकास काटे व साई गणेश  सिनगर (अस्थेटिक बिल्ड व बेस्ट रन टाईम), सखी धनंजय कुंभार, निश्का  विरेश  अग्रवाल, आरोही अतुल इंनामके व अनण्य संकेत मुळे (बेस्ट डीझाईन), अर्श  योगेश  भैरवकर, ईशान  हर्षद  पारख व तन्मय सुनिल कोकाटे (बेस्ट इफिसिएंट बिल्ड), जय तरूण भुसारी, नील विकास काटे, साई गणेश सिनगर व विजयलक्ष्मी कृष्णा आढाव (बेस्ट स्ट्रटेजी अवार्ड), कार्तिक दत्तात्रय खुरपे व आदित्य धनराज सोनवणे (बेस्ट इनोव्हेशन अवार्ड) आणि हर्षवर्धन  प्रसाद खालकर व धैर्य शैलेश  कोठारी (बेस्ट मेकॅनिझम अवार्ड).
    विद्यार्थ्यांच्या या राष्ट्रीय  यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष  नितिन कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांचे  मार्गदर्शक  प्रा. आदित्य गायकवाड यांचे अभिनंदन केले

आयआयटी पवई ने आयोजित केलेल्या या  राष्ट्रीय टेकफेस्ट स्पर्धेत देशभरातील शालेय विद्यार्थ्यांबरोबरच पॉलीटेक्निक्स, इंजिनिअरींग कॉलेज मधिल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.  संजीवनी अकॅडमी आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कुल मध्ये शालेय स्तरावरच अभियांत्रिकेचे देखील  शिक्षण दिले जाते. त्यामुळे संजीवनीच्या या शालेय विद्यार्थ्यांनी चक्क इंजिनिअरींग व पाॅलीटेक्नीकच्या विद्यार्थ्यां सोबत स्पर्धा करून विजयश्री खेचुन आणली. हे या विजयी कामगीरीचे वैशिष्ट म्हणावे लागेल.

डाॅ.मनाली कोल्हे (संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ  स्कुल्स) 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे