के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूने मिळवले राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत रौप्य पदक

के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूने मिळवले राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत रौप्य पदक
के.बी.रोहमारे महाविद्यालयाच्या खेळाडूने मिळवले राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत रौप्य पदक

कोपरगाव विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२६– महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशनच्यावतीने १९ व्या ज्युनियर राज्यस्तरीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २१ ते २४ जानेवारी दरम्यान संत गाडगेबाबा महाराज विद्यापीठ, अमरावती येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उपविजेतेपद ( रौप्य पदक) मिळविले आहे.

सदर उपविजेत्या संघात के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू जकरिया सलीम शेख हा सहभागी होता. या विद्यार्थ्याचे प्रजासत्ताक दिनी यथोचित सन्मान करण्यात आला. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल को. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदीपदादा रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.व्हि.सी.ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे व क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.