अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट; दुबईमधील कंपनीत मोठ्या पॅकेजवर निवड
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट; दुबईमधील कंपनीत मोठ्या पॅकेजवर निवड
जाहिरात
संगमनेर विजय कापसे दि ३१ जानेवारी २०२६-गुणवत्ता पूर्ण उच्च शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकने विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर टाईप केला असून यामधून दुबई येथील नामांकित कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची मोठ्या पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा व्ही बी धुमाळ यांनी दिली आहे.
जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य धुमाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर समन्वय करण्यात आला आहे. सौ शरयू ताई देशमुख यांच्या पुढाकारातून दुबई स्थित जीबीएमटी स्टील सर्विसेस या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये पवन कडभाने याची 7.20 लाख पॅकेजवर तर मयूर निरगुडे याची 7.34 लाख पॅकेजवर निवड झाली आहे हे संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची असून या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट विभागाचे प्राध्यापक एस एस गंधे व यशस्वी देशमुख एमबी सातपुते यांनी विशेष मार्गदर्शन केलेजाहिरात
या सर्व विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव प्राचार्य प्राध्यापक व्ही बी धुमाळ , उपप्राचार्य जी.बी काळे यांनी अभिनंदन केले आहे