आपला जिल्हा

के.जे. सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धा संपन्न 

के.जे. सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धा संपन्न 

के.जे. सोमैया महाविद्यालयात तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धा संपन्न 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२६के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि.२३ ते २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली. या बॅडमिंटन स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित होते. तीन दिवस खेळल्या गेलेल्या या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा पुरुष ओपन(डबल), मिक्स डबल, 35 वयोगटावरील पुरुष (डबल) असे गट तयार करण्यात आले होते.

जाहिरात

35 वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक  राकेश पठारे व नितिन गाढवे – सांगली  यांनी तर द्वितीय पारितोषिक राहुल तिवारी व नितिन गाढवे- बार्शी तर तृतीय पारितोषिक ऋषिकेश बनकर व विकास भोसले- संभाजीनगर यांनी पटकावले. पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक तेजस खोमणे व  मोहित आस्वानी , द्वितीय पारितोषिक राहुल तिवारी व नितिन गाढवे  तर तृतीय पारितोषिक किरण वर्पे व मनोज जगदाळे यांनी पटकावले.

जाहिरात

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतमनगर चे उपाध्यक्ष  प्रविण शिंदे हे उपस्थित होते. यावेळी कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष  संदीपराव रोहमारे,  एस. पी. कुलकर्णी,  अतुल कातकाडे,  आदिनाथ  ढाकणे,  सागर  रोड़े,  रविन्द्र पानगव्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्राप्त सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

जाहिरात

या  तीन दिवसीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ. दिपक बुधवंत,  साई शेळके,  किशोर गायकवाड यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे