केबीपी शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
केबीपी शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२६: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल, साईबाबा तपोभूमी, साई कॉर्नर, कोपरगाव येथे अतिशय उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात रयत शिक्षण संस्था, उत्तर विभागीय सल्लागार मंडळ, अहिल्यानगरचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
जाहिरात
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच शाळेच्या आजपर्यंतच्या यशोगाथेचा सविस्तर अहवाल वाचन माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक लव्हाटे के. डी. यांनी केले.तर आमदार आशुतोष काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.जाहिरात
या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त, कष्ट व सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक लव्हाटे के. डी. व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लंके एस. वाय. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाटिका, समूहगायन व देशभक्तीपर कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले व उपस्थितांची मने जिंकली.जाहिरात
या प्रसंगी पद्माकांत कुदळे जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा, दिनार कुदळे, रमेश गवळी, वडांगळे सर, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब रुईकर, डॉ. वर्षाताई झवर, शिवाजीराव वलटे, शिवाजी ठाकरे, संदीप कपिले, सरला जाधव, औताडे ताई, सुवर्णाताई वडवे, आशा दामोले, बाबासाहेब परजणे, साईनाथ घुमे, सुनील शिंदे, उपमुख्याध्यापक कोल्हे बी. के., पर्यवेक्षक दाणे आर. व्ही. व सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण एस. एस., शालेय व्यवस्थापन समिती, विकास समिती, सल्लागार समिती, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, देणगीदार, शिक्षकवृंद, सेवकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.