कोपरगाव विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२६– बहुचर्चित कोपरगाव येथे लायन्स, लिनेस व लियो क्लब ऑफ कोपरगाव तसेच क्रेडाई कोपरगाव यांच्या वतीने आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह प्रायोजित बिझनेस २०२६ उत्सवास आज गुरुवार दि १२ फेब्रुवारी पासून मोठ्या जल्लोषात थाटामाटात शुभारंभ होणार आहे.लायन्स
या बिझनेस एक्स्पोची सुरुवात उत्सव कोपरगावचा वारसा भारतीय संस्कृतीचा यानुसार भारतातील विविध राज्यातील वेशभूषा, परंपरा, लोकनृत्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने संपूर्ण कोपरगाव शहरातून भव्य रॅली द्वारे होणार आहे सदर रॅली ची सुरुवात दुपारी ठीक ४ वाजता तहसील मैदान येथून होऊन गुरुद्वारा रोड,अहिंसा स्तंभ, बस स्टँड, खंदक नाला, आण्णाभाऊ साठें स्मारक मार्गे महात्मा गांधी प्रदर्शन म्हणजेच लायन्स बिझनेस एक्स्पोच्या ठिकाणी समारोप होणार आहे.जाहिरात
या रॅलीत वेगवेगळे संघ सहभागी होणार असून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांपैकी प्रथम ६ संघांना प्रथम बक्षीस हॉटेल पाम पॅराडाएझ तर्फे २१ हजार रुपये, दुसरे बक्षीस साई कुबेर डेव्हलपर्स तर्फे १८ हजार रुपये, तृतीय बक्षीस विमल फर्निचर तर्फे १५ हजार रुपये, चतुर्थ बक्षीस शुभम ग्लास डेपो नाशिक यांच्या वतीने ११ हजार रुपये, पाचवे बक्षीस टोपोलिना कॅफे तर्फे ६ हजार रुपये तसेच सहावे बक्षीस कल्पतरू डेव्हलपर्स तफे ५ हजार रुपये रोख स्वरूपात दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ला.राम थोरे ९५९५३९३६१०, ला.सुरेश शिंदे ९८५०८४९७६५, लियो मानस नागरे ९५२७४७६०४५ व लियो श्रीराम बागुल ९०७५२१५७५९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.