आपला जिल्हा

“जी गोष्ट झालीच नाही, त्यावर आंदोलन कशासाठी?”; ५ तारखेच्या आंदोलनावर सुजय विखे यांचा टोला

“जी गोष्ट झालीच नाही, त्यावर आंदोलन कशासाठी?”; ५ तारखेच्या आंदोलनावर सुजय विखे यांचा टोला

“जी गोष्ट झालीच नाही, त्यावर आंदोलन कशासाठी?”; ५ तारखेच्या आंदोलनावर सुजय विखे यांचा टोला

Ahilyanagar vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६ : प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याची कोणतीही अधिकृत माहिती किंवा आदेश नसताना त्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेणे योग्य नाही. जी गोष्ट झालेलीच नाही, त्यावर चर्चा करणे किंवा आंदोलनाची घोषणा करणे काहीसे हास्यास्पद आहे, असा टोला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.
प्रकल्पाच्या कामासंदर्भात काही जणांनी निवेदन देऊन ५ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याच्या चर्चेमुळे संभ्रम निर्माण झाला असून, काम सुरू झाले नाही किंवा लेखी आश्वासन मिळाले नाही, तर नगरच्या इतिहासात कधी झाले नसेल असे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले की, संबंधित निवेदनाला जलसंपदा विभागाकडून योग्य ते उत्तर दिले जाईल. माझ्या माहितीनुसार, या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची स्थगिती मिळालेली नाही. स्थगितीचा कोणताही आदेश नाही. त्यामुळे या विषयाबाबत कोणाच्या काही शंका किंवा प्रश्न असतील, तर जलसंपदा विभाग त्यांना पूर्ण लेखी खुलासा देईल.

जाहिरात

गेल्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून, मंत्रिमंडळानेही त्याला मंजुरी दिली आहे. प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

“एवढी वर्षे हा प्रकल्प रखडलेला असताना कोणी आंदोलन केले नाही. आता काम मार्गी लागत असताना आंदोलन करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असेल, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे,” असे विखे पाटील म्हणाले.
या प्रकल्पासाठी गेल्या ३०-४० वर्षांत अनेकांनी संघर्ष केला आहे. त्यामुळे त्या सर्वांचे योगदान आहे. रोहित पवार यांनीही या विषयावर भूमिका मांडली असेल, तर त्यांचे योगदानही नाकारता येणार नाही. मात्र, प्रत्येकाने श्रेयासाठी भांडण्यापेक्षा प्रकल्प पूर्ण कसा होईल, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरून विरोधकांकडून सरकारवर होत असलेल्या टीकेबाबत विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत, विद्यार्थ्यांची फी माफी यांसह विविध मागण्या विरोधकांकडून केल्या जात आहेत. विरोधकांचे काम टीका करणे आहे आणि ते त्यांचे काम करत आहेत. काही जणांना सत्तेत येण्याची घाई झाली आहे; मात्र ते त्यांचे स्वप्न असून ते स्वप्नच राहील, अशी टीकाही त्यांनी केली.

जाहिरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेने मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आहे. दुष्काळासंदर्भातील शासन निर्णयामध्ये ‘ट्रिगर-१’ सक्रिय करण्यात आला आहे. साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित परतीचा पाऊस झाला नाही, तर पुढील टप्प्यात ‘ट्रिगर-२’ सक्रिय करण्याची प्रक्रिया होऊ शकते. या तांत्रिक बाबींचा सविस्तर खुलासा संबंधित विभाग करेल. सरकार शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे