आपला जिल्हा

संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये ‘टिंकरर्स लॅब’चे उद्घाटन

संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये ‘टिंकरर्स लॅब’चे उद्घाटन

ग्रामीण विद्यार्थ्यांना सर्जनशिलता आणि कौशल्ये विकसीत करण्याची संधी- संदीप नाटेकर
                                 

कोपरगाव विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६: संजीवनी युनिव्हर्सिटीच्या  माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आयआयटीच्या दर्जाचे ज्ञान, सर्जनशीलता  व कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळावी या हेतूने येथे टिंकरर्स लॅब सुरू करण्यात आली. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे संजीवनी युनिव्हर्सिटीने जगाच्या बरोबर पहिले आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. असे प्रतिपादन मेकर भवन फाऊंडेशन (यूएसए) चे सिनिअर मॅनेजर  संदीप नाटेकर यांनी केले.

जाहिरात

     संजीवनी युनिव्हर्सिटीतील टिंकरर्स लॅबच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट  अमित कोल्हे होते. यावेळी व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे , प्रोजेक्ट डायरेक्टर व या लॅबचे समन्वयक डॉ. किरण वाकचौरे, डायरेक्टर्स, डीन व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

     नाटेकर म्हणाले, मेकर भवन फाऊंडेशनने सुमारे  अडोतीस  लाख रूपये किंमतीची उपकरणे देऊन येथे हि लॅब उभारली.  टिंकरर्स लॅब ही विद्यार्थ्यांना सज्ज करणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे.  ज्ञान, कौशल्य, सर्जनशिलता आणि आत्मविश्वास  यांचा संगम साधणारे हे व्यासपीठ आहे. संजीवनी युनिव्हर्सिटीच्या व्यवस्थापनाची दुरदूरदृष्टि आणि  येथिल विद्यार्थ्यांची प्रयोगशील  उत्सुकता लक्षात घेवुन आम्ही हि लॅब उभारली.

जाहिरात

     प्रारंभी डॉ. वाकचौरे यांनी सांगीतले की या लॅबच्या माध्यमातुन संजीवनी युनिव्हर्सिटीतील  विद्यार्थ्यांना संशोधनाधिष्टीत  विकास,  हॅकाथॉन, राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्पर्धा, स्टार्ट अप मध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा उध्देश  आहे. ही लॅब एक खुली व बहुविषयक सहयोगी कामाची जागा (मेकरस्पेस) म्हणुन विकसीत करण्यात आली आहे.  यात डिजिटल फॅब्रिकेशन, रोबोटिक्स, फिजिकल कॉम्प्युटींग, कृत्रिम बुध्दिमत्ता, एम्बेडेड सिस्टिीम, रॅपिड प्रोटोटायपिंग आणि उत्पादन विकास अशा  विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल.

जाहिरात

     डॉ. ठाकुर म्हणाले संस्थेचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची हि स्वप्नपूर्ती आहे. संजीवनीचे  अध्यक्ष नितिन कोल्हे यांच्या दुरदृष्टीतून हि लॅब सुरू झाली.


टिंकरर्स लॅबची उभारणी ही  एक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती आहे. या लॅबचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून, ‘हॅन्डस्-ऑन’ प्रशिक्षण देण्याचा आहे. संजीवनी युनिर्व्हसिटीची लोकल ते ग्लोबल अशी वाटचाल सुरू आहे. या  जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक लॅबची उभारणी हा त्याचाच एक भाग आहे. तळागाळातील विद्यार्थी सक्षम झाले, तर संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था उजळून निघतेय कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नवचैतन्याची ठिणगी (स्पार्क) असून योग्य संधी मिळाल्यास तो ज्ञानाच्या प्रकाशाने उजळू शकतो.-अमित कोल्हे, प्रेसिडेंट संजीवनी युनिव्हर्सिटी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे