आपला जिल्हा

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ फेब्रुवारी २०२६एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक तथा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराणा फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी अमृता लॉन्स येथे खुली तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.विजय पवार यांनी दिली आहे.

जाहिरात
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ.विजय पवार म्हणाले की, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महिला सबलीकरण व महिलांचे आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याचबरोबर तालुक्यातील तरुणांना करिअर, कला,क्रीडा क्षेत्रामध्ये व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवराणा कुटुंब फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

जाहिरात

यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी नऊ वाजता अमृता लॉन्स घुलेवाडी येथे जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे,नामदेव कुळधरण आधी उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

तरी या स्पर्धेसाठी नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.विजय पवार,लक्ष्मण शिंदे, गौतम पुरी व शिवराणा कुटुंब फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ जयश्री थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे