आपला जिल्हा

शहरातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी १५ मार्च पर्यंत पूर्ण करणार- अंगणवाडी सेविका

 शहरातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी १५ मार्च पर्यंत पूर्ण करणार- अंगणवाडी सेविका
अंगणवाडी सेविकांची नगराध्यक्ष पराग संधान यांच्याशी चर्चा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेने येत्या १५ मार्च २०२६ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांची नुकतीच भेट घेऊन शहरातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.शासनाने ठरवून दिलेल्या तारखेपूर्वी सर्व लाभार्थींनी अंगणवाडी सेविकांना भेटून कागदपत्रांची पूर्तता करावी व ठरलेल्या वेळेत आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी,असे आवाहन कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात

यावेळी कोपरगाव शहरातील अंगणवाडी सेविकांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाशी विविध विषयांवर चर्चा करून शासकीय उपक्रमांसाठी आवश्यक ती मदत करण्याचे निश्चित केले आहे.यामुळे शहरातील केवायसीपासून वंचित राहिलेल्या समस्त लाडक्या बहिणींच्या अडचणी दूर होऊन त्यांची ई-केवायसी पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.या कालावधीत कोपरगाव शहरातील लाडक्या बहिण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी प्रशासन व नगरपालिकेला आवश्यक ते सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

महायुती सरकारच्या माध्यमातून २०२४ मध्ये राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली. गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर दरमहा १,५०० रुपये शासनाच्या वतीने थेट जमा केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगावच्या मा. आ.स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील लाडक्या बहिणींना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.कोल्हे परिवाराच्या वतीने  शहरातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. अनेक महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून त्या विविध समित्यांमध्ये सभापती म्हणून देखील कार्यरत आहेत.
याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, गटनेते प्रसाद आढाव,विनोद राक्षे,कैलास मंजुळ, संदीप देवकर, फिरोज पठाण आदी उपस्थित होते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे