आपला जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श प्रशासक- गटविकास अधिकारी दळवी

छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श प्रशासक- गटविकास अधिकारी दळवी
छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श प्रशासक- गटविकास अधिकारी दळवी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२६संबंध हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे एक महाप्रतापी धुरंधर राजे आदर्श शासनकर्ते गरिबांचे कैवारी जाणता राजा होते तसेच ते उत्तम आदर्श प्रशासक देखील होते असे प्रतिपादन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करते प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

जाहिरात
कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते सर्वांनी यावेळेस फेटे परिधान करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

जाहिरात
या प्रसंगी गटविकास अधिकारी संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे,विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे, प्रशांत वाघमारे,सहायक लेखाधिकारी गणेश सोनवणे,प्रशासन अधिकारी संतोष नलगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश डोंगरे, वरिष्ठ सहाय्यक बाळासाहेब मिसाळ, कालीप्रसाद कुऱ्हे,  वरिष्ठ सहाय्यक कल्पना सोनवणे, सीमा जमदाडे, दीपिका कचवे,भाग्यश्री सोनकांबळे, शिंगाडे मॅडम, शुभम टाके, प्रदीप चव्हाण तसेच उमेद कक्षातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.या प्रसंगी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे