आपला जिल्हा

राज्यस्तरीय सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगांव व अमरावती जिल्हाचे वर्चस्व

 राज्यस्तरीय सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगांव व अमरावती जिल्हाचे वर्चस्व
राज्यस्तरीय सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगांव व अमरावती जिल्हाचे वर्चस्व
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२६राज्यातील ग्रामिण भागातील युवा खेळाडूना सुवर्णसंधी  प्राप्त व्हावी म्हणून  राज्यस्तरीय १७वी सब ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिर्डी येथील  गोल्डन क्रिकेट अँकडमी व के. पी. क्रिकेट अँकडमीच्या भव्य मैदानावर पार पडली.या स्पर्धाचे पारितोषिक वितरण आशियाई श्री भारत व महाराष्ट्र श्री तसेच जागतिक स्पर्धा विजेते बॉडीबिल्डर किरण पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी साई निर्माण समुहाचे विजय कोते,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र इखणकर , उपाध्यक्ष इंद्रजीत नितीनवार ,अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अरुण चंद्रे ,  अजय देशमुख उपस्थित होते.

जाहिरात
खेळाडुना मार्गदर्शन करताना किरण पाटील म्हणाले की बेसबाँल या खेळाचे उज्वल भविष्य आहे. खेळाडुनी यश प्राप्तीसाठी अपार मेहनत घ्यावी. पुढील काळात बेसबाँल असोसिएशनला आवश्यक सहकार्य करण्याचे  जाहिर केले. महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन महासचिव राजेंद्र इखणकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सहसचिव तथा अहिल्यानगर जिल्हा सचिव  मकरंद को-हाळकर सर यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी राज्यातील  संघांनी  सहभाग घेतल्याबद्दल कौतुक केले.

जाहिरात
या स्पर्धेच्या आयोजनासाठी, सह सचिव कल्पेश भागवत,  तसेच रिजवान पठाण प्रा. सुनिल कुटेसर,छत्रपती अवार्ड विजेते अक्षय आव्हाड,उमेश वाघोले  कन्हैया गंगुलेआकाश शिंदे, सोमनाथ सपकाळ, युवराज मांडकर, गणेश गायकवाड आदिंनी विशेष परीश्रम घेतले. या स्पर्धात एकुण २० मुलांचे व१८ मुलीचे संघ सहभागी झाले. या स्पर्धेमुळे शिर्डी येथे क्रीडामय वातावरण तयार झाले होते.
या मध्ये १७ वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय बेसबाँल स्पर्धा मुले मध्ये जळगांव जिल्हा प्रथम,अमरावती जिल्हा द्वितीय,कोल्हापूर जिल्हा तृतीय ,अहिल्यानगर जिल्हा चतृर्थ तर मुलीच्या संघात अमरावती  जिल्हा प्रथम,जळगांव जिल्हा द्वितीय,नांदेड जिल्हा तृ़तीय,लातुर जिल्हा  चतुर्थ क्रमकांचे बक्षिस मिळविली तर  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्पेश भागवत यांनी तर आभार पंच प्रमुख आनंदा कांबळे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे