छत्रपतीं शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डाऊच गावात शिवव्यख्यान संपन्न
छत्रपतीं शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डाऊच गावात शिवव्यख्यान संपन्न
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२६– आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शिकवण सर्व जगाला प्रेरणादायी असून आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणी नुसार आपली वाटचाल सुरू ठेवली तर आपल्या प्रगती प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा संतोष चव्हाण यांनी डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ३९६ व्या जयंती निमित्त बोलताना व्यक्त केले.
जाहिरात
डाऊच बुद्रुक गावच्या वतीने अत्यंत साधेपणाने छत्रपतींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करत जयंती सोहळा साजरा केला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड, महर्षी विद्यालयाचे उपप्राचार्य कैलास ढमाले, आदिशक्ती महिला अध्यक्ष स्वाती ढमाले, संस्कृत शिक्षक अमोल देशमुख, सोमैय्या महाविद्यालयाचे संपत माळी, ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील, शिवप्रतिष्ठान मंडळाचे सागर ढमाले यांच्यासह ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच गावातील तरुण कार्यकर्ते महिला शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
या प्रसंगी ह.भ.प मनसुख महाराज दहे यांनी शिवव्याख्याते चव्हाण यांचा सत्कार केला तर स्वाती ढमाले यांनी एकच राजा इथे जन्मला या शिव गीताचे गायन केले तसेच ओजस्वी अमोल देशमुख यांनी शिव विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
तर या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा. संतोष चव्हाण यांनी शिवाजी महाराजांचे बालपण, शिक्षण, संस्कार, गड- किल्ले,युद्धनीती,पुरोगामी विचार, सर्वधर्मसमभाव, गनिमी कावा, विश्वासू सहकारी आणि महिलांबद्दल चे विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनक्रम, घटनाक्रम उपस्थित समोर मांडला. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत गावाने सहभाग घेतलेला असून शासनाचे निकष,अटी व शर्ती प्रमाणे ग्रामपंचायतीला सहकार्य करावे तसेच आपल्या गावाला ५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ, आजी-माजी पदाधिकारी, होतकरू तरुण मित्र मंडळ, महिला बचत गटाच्या सदस्या, वारकरी भजनी मंडळातील सदस्य,ज्येष्ठ नागरिक तसेच जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी,आरोग्य विभाग व इतर सर्व शासकीय विभागांनी व ग्रामस्थांनी स्वतः ला झोकून देऊन टीमवर्क काम करावे, असे आवाहन केले.