आपला जिल्हा

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कलाविष्कार

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण कलाविष्कार

अमृतवाहिनीच्या अमृतस्पंदन मधून देशाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन; दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले अमृत स्पंदन

विद्यार्थ्यांच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी अभ्यासाबरोबर सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाचे–मा. आ डॉ तांबे

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ६ एप्रिल २०२६महाराष्ट्रात सह पुणे विद्यापीठात गुणवत्तेने अग्रगण्य ठरलेल्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना चांगल्या उच्च शिक्षणाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. अमृत स्पंदन या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या कार्यक्रमासह भारताच्या एकतेचे सांस्कृतिक दर्शन दाखवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत भरत आपले दर्जेदार कलाविष्कार सादर केले.

जाहिरात

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत स्पंदन 2026 या वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी अमृत कलामंच येथे उद्घाटन प्रसंगी मा आ डॉ सुधीर तांबे, विश्वस्त ॲड आर बी सोनवणे , विलास वर्पे, तुळशीनाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

कार्यक्रमाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने फेटे बांधून हवेत बलून सोडून करण्यात आले. यावेळी झांजरी पथक आणि लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले याच दरम्यान झालेल्या ट्रॅडिशनल डे ,मिस मॅच ,रेट्रो व बॉलीवूड डे या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.

जाहिरात

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गणरायाला वंदनासाठी व्यासपीठावर एकाच वेळी अवतरलेले 30 विद्यार्थी वर्ग स्टेज आकर्षक लाइटिंग आणि गणेश वंदना यातून सुरुवात झाली. यानंतर बासरी संगीतावर झालेले नृत्य, बॉलीवूड गाण्यांवरील मिक्स फ्युजन सॉंग, यांनी लक्ष वेधून घेतले तर भक्ती टिळेकर सादर केलेल्या लावणीने मराठमोळे वातावरण निर्माण केले, त्याचबरोबर बिहू नृत्य, पंजाबी भांगडा, आसामी नृत्य, देवीचा गोंधळ, खंडोबा गीते, आईच्या जागर या मराठी गीतांना टाळ्यांची मोठी दाद मिळाली.

सून रही है ना नवरी आली या गीतांना विद्यार्थ्यांनी डोक्यावर घेतले. तारक मेहता का उल्टा चश्मा या नाट्यछट्याने सर्वांना खळखळून हसवले तर लख्ख पडला प्रकाश या गीताने अंगावर शहारे आणले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जाणता राजा या नाट्यप्रयोगाने इतिहासकालीन प्रसंग उभे करत रोमांचकारी वातावरण निर्माण केले. यावेळी झालेल्या घोषणाबाजीने परिसरात भक्ती पूर्ण वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेमधून देशातलौकिक निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास महत्त्वाचा आहेच परंतु त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक उपक्रमांना ही तितकेच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा यामधून सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. प्रत्येकासाठी महाविद्यालयीन जीवन हे जीवनासाठी कायम मोठा अनमोल असल्याचे ते म्हणाले.

तर प्राचार्य डॉ व्यंकटेश म्हणाले की अमृतवाहिनी महाविद्यालयाने सातत्याने चांगले शिक्षण दिले असून महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा संदीप पंडित व प्रा मयुरी गाडे यांच्यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा आ डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश,  प्रा व्ही.पी वाघे यांच्यासह सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे