आपला जिल्हा

काळे कारखाना कार्यस्थळावरील श्री स्वामी समर्थ केंद्रात नवनाथ ग्रंथाचे अखंड पारायण संपन्न

काळे कारखाना कार्यस्थळावरील श्री स्वामी समर्थ केंद्रात नवनाथ ग्रंथाचे अखंड पारायण संपन्न

काळे कारखाना कार्यस्थळावरील श्री स्वामी समर्थ केंद्रात नवनाथ ग्रंथाचे अखंड पारायण संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२६-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये कानिफनाथ महाराज यात्रेनिमित्त एक दिवसीय श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे सामूहिक पारायण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या भक्ती सोहळ्याला अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका  चैताली काळे यांनी सदिच्छा भेट दिली आणि भाविकांशी संवाद साधला.

जाहिरात

कानिफनाथ महाराज यांच्या यात्रेचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पहाटेपासून वाचनास सुरुवात करण्यात आली यावेळी कारखाना परिसरातील शेकडो भाविक एकत्र आले होते. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नाथ पंथातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो.

जाहिरात

दरम्यान  चैताली काळे यांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की धार्मिक ग्रंथ पारायणामुळे मनाला शांती मिळते आणि समाजात सद्भावनेचा संदेश जातो. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना परिसरातील हे सेवा केंद्र केवळ भक्तीचेच नव्हे, तर संस्कारांचे देखील केंद्र बनले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे