आपला जिल्हा

समतात महिला दिनानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत आरोग्य तपासणी 

समतात महिला दिनानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत आरोग्य तपासणी 
समतात महिला दिनानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोफत आरोग्य तपासणी 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ मार्च २०२६ : जागतिक महिला दिनानिमित्त समता पतसंस्था व ज्येष्ठ नागरिक महिला समिती, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समता पतसंस्थेत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष विजय बंब, ज्येष्ठ नागरिक महिला समितीच्या सदस्य जयश्री शहा, चंदाताई कोठारी, तसेच समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त  स्वाती कोयटे आदींसह महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

जाहिरात
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महिलांची नाडी तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी समुपदेशन करण्यात आले. नाडी तपासणीच्या माध्यमातून शरीरातील विविध बदल आणि आरोग्य स्थितीची माहिती कशी मिळते, याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या आरोग्याबाबत जागरूकता दाखविली.

जाहिरात
पूर्वी नाडी तपासणी ही पारंपरिक पद्धतीने केली जात असे. मात्र आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नाडी तपासणी अधिक अचूकपणे करता येत असून जयपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील वेदालेक्स कंपनीच्या नवीन जपानी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात आली. क्वांटम रेझोनन्स थेरपी बॉडी अ‍ॅनालायझर मशीन या आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतीमुळे आरोग्याविषयी अधिक नेमकी माहिती मिळण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जाहिरात
या शिबिरासाठी जयपूर येथील वैद्यकीय क्षेत्रातील वेदालेक्स कंपनीचे हेल्थ कन्सल्टंट नानाभाऊ डोईफोडे, नाशिक येथील सुभाष शिलेदार व राजेंद्र कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित झाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे