आपला जिल्हा

के. जे. सोमैया महाविद्यालयात आधुनिक संशोधन पद्धती विषयावर सेमिनार संपन्न

के. जे. सोमैया महाविद्यालयात आधुनिक संशोधन पद्धती विषयावर सेमिनार संपन्न

के. जे. सोमैया महाविद्यालयात आधुनिक संशोधन पद्धती विषयावर सेमिनार संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ मार्च २०२६के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय सेमिनार नुकतेच संपन्न झाले. बुधवार दि. 11 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सेमिनारचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड़ व लखनऊ विद्यापीठ, लखनऊ यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदिप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. विजय ठाणगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

जाहिरात

या सेमिनार च्या उद्धाटकीय मनोगतात डॉ. सर्जेराव निमसे यांनी सेमिनारच्या उद्घाटनाची उद्घोषणा करतानांच संशोधन म्हणजे ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सीमा ओलांडून नवीन क्रांतिकारी कल्पना विकसित करणे असल्याचे म्हटले.  कटिंग एज रिसर्च हे सध्या सुरू असलेले अत्यंत प्रगत, नाविन्यपूर्ण आणि उच्च-स्तरीय संशोधन असल्याचे सांगत या आधुनिक पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवन सोपे करण्यावर आपण भर दिला पाहिजे असे ते  म्हणाले.

जाहिरात

उद्घाटन सत्राच्या अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त  संदीपराव रोहमारे यांनी संशोधनासारख्या विषयावर आयोजित या सेमिनारच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीतुन नवनिर्माण साकार होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व संशोधनपुरक दृष्टिकोण वाढीसाठी महाविद्यालय सदैव कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी स्वागत मनोगतात उपस्थितांचे स्वागत करतांनाच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनासारखे विषय समाविष्ट असल्याने या संशोधन सेमिनारचा फायदा महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद व्यक्त केला. या सेमिनारच्या निमित्ताने आयोजक महाविद्यालय व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी लिहिलेल्या 68 शोध निबंध संशोधन पत्रिकेचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  करण्यात आले.

जाहिरात

या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत डॉ. पी.  बी. शेळके, डॉ. ए. एस. वाणी, डॉ. एस. एन. शेळके, डॉ. जी. जी. मंदावाड यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सत्रे संपन्न झाली. या कार्यशाळेच्या विविध मार्गदर्शन सत्रासाठी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयातील संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी यांची उपस्थिति लक्षणीय होती. उद्घाटन सत्र कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या सेमिनारचे संयोजक डॉ. एस. जी. कोंडा यांनी या राज्यस्तरीय कार्यशाळेची भूमिका विशद केली. तर उपस्थित मान्यवरांचा परिचय डॉ. निलेश पोटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार डॉ. गणेश शिंदे यांनी मानले.

जाहिरात

कार्यशाळेच्या समारोप समारंभ कार्यक्रमात आयोजक व इतर महाविद्यालयातुन उपस्थित असलेल्या सहभागी विद्यार्थ्यानी या सेमिनारचा गुणात्मक अहवाल सादर करतांना महाविद्यालयाचे आयोजन प्रशंसनीय व अनुकरणीय असल्याचे म्हंटले. या सेमिनारचे यशस्वी आयोजन डॉ. बी. बी. भोसले, डॉ.बी.एस.गायकवाड़, डॉ.एन.आर.दळवी, डॉ. बी. डी. गव्हाणे, डॉ.एन. जी. शिंदे, डॉ. एन. टी. ढोकळे, प्रा. एस. एस. नागरे, डॉ. आर. बी. तलवारे, डॉ. एम. बी. खोसे, डॉ. एस. एम. देवरे, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे