संजीवनीच्या ६ विद्यार्थ्यांची अंतिम निकालापूर्वीच जॉन्सन कंपनीत नोकरीसाठी निवड
संजीवनीच्या ६ विद्यार्थ्यांची अंतिम निकालापूर्वीच जॉन्सन कंपनीत नोकरीसाठी निवड
उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा ग्रामीण विद्यार्थ्यांना फायदा

Kopargaon vijay kapse दि २२ मार्च २०२६– जाॅन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल या नामांकीत कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सहा विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी दिली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द पुढाकारामुळे हे शक्य झाले. या विभागाच्या माध्यमातून नामांकित कंपन्याना हवे असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने विध्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे बऱ्याचदा परिक्षेच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती नोकरीची आर्डर मिळालेली असते, अशी माहिती संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जॉन्सन कंट्रोल्स इंटरनॅशनल पी एल सी या नामांकित कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल झाले. गुणवत्ता केंद्रित शिक्षण पद्धती आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे हे शक्य होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या रोहीत सुनिल काकड, अमोल अशोक खेडकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या वैष्णवी भाऊसाहेब लहरे, समर्थ बाळासाहेब पवार, सौरभ बाबासाहेब पवार व मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींगच्या साई सोमनाथ बनकर यांचा समावेश आहे.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विविध कंपन्यांच्या व्यवस्थापना सोबत सातत्याने संपर्क ठेवला जातो. औद्योगिक क्षेत्रातील तंत्रज्ञान सातत्याने बदलते. त्यानुसार विध्यार्थ्यांना नेमके कसे प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे याबाबत या कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडून माहिती करून घेतले जाते. त्यानुसार विध्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांची तांत्रिक तयारी पूर्ण झाली की या कंपन्या नव्या तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेल्या या विध्यार्थ्यांना नोकरी देताना प्राधान्य देतात. कंपन्याकडून विध्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यासाठी आवश्यक असलेले सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयातील या सर्वांगीण प्रशिक्षण प्रक्रियेचा विध्यार्थ्यांना मोठा फायदा होत असून, त्यांना उच्च दर्जाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. ग्रामीण भागात स्थित असूनही संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज आधुनिक उद्योगांसाठी कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात अग्रस्थानी आहे, हे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. आर. ए. कापगते, डाॅ. एम.व्ही.नागरहल्ली, डाॅ. व्ही. एम. तिडके, डाॅ. पी. एम. पटारे व प्रा. डी. ए. कुंभार आदि उपस्थित होते.




