घरकुल बांधकामासाठी ३१ मार्च पर्यंत अंतिम मुदत- गटविकास अधिकारी दळवी
अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २२ मार्च २०२६-प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या ५२३४ लाभार्थ्यांना घरकुलांच्या बांधकामाबाबत कोपरगाव तालुक्यात प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, ३१ मार्चपर्यंत प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास संबंधित घरकुले रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांकडून मिळालेल्या अनुदानाची वसुली देखील करण्यात येईल असा कडक इशारा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी दिला आहे.
जाहिरात
कोपरगाव तालुक्यात ६०३४ घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतरही १९७८ लाभाथ्यांनी अद्याप बांधकाम सुरू केलेले नाही. प्रशासनाध्या माहितीनुसार, मंजूर घरकुलांपैकी १९७८ लाभार्थ्यांना पहिला हप्ता घेऊनही एक वर्ष उलटून गेले तरी मात्र अद्याप पायाभरणी केलेली नाही. यामुळे शासनाच्या उद्दिष्टांवर परिणाम होत असून, निधी अडकून पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.जाहिरात
पंचायत समिती कोपरगाव मार्फत संबंधित लाभार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अधिकारायाजी प्रत्यक्ष भेटी देऊन कामाची पाहणी केली असून, जे लाभार्थी ठराविक मुदतीत काम सुरू करणार नाहीत त्यांच्यावर घरकुल रद्द करण्याची कारवाई होणार आहे. काही प्रकरणांमध्ये ग्रामसभेमार्फतही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.जाहिरात
प्रशासनाकडून सांगण्यात आले की, घरकुलासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिले जाते. परंतु अनेक लाभार्थी विविध कारणांमुळे काम प्रलंबित ठेवत असल्याने इतर पात्र नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कठोर पावले उचलली जाणार आहेत.गटविकास अधिकारी दळवी
केंद्र आणि राज्य शासनाकडून गरजूंसाठी हक्काचे घर देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात असताना अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, जे लाभार्थी बांधकाम सुरू करून पुढील हप्त्यांसाठी पात्र ठरतील, त्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरु ठेवण्यात येणार आहे. कोपरगाव प्रशासनाने सर्व लाभाथ्यर्थ्यांना तातडीने काम सुरू करण्याचे आवाहन केले असून, अन्यथा घरकुल रद्द व अनुदान वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी स्पष्ट केले आहे.घरकूल