आपला जिल्हा

स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून विविध कार्यक्रमानी होणार साजरी

स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून विविध कार्यक्रमानी होणार साजरी

स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांची २४ मार्च रोजी जयंती प्रेरणादिन म्हणून विविध कार्यक्रमानी होणार साजरी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ मार्च २०२६माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा २४ मार्च हा जन्मदिवस दरवर्षी “प्रेरणादिन” म्हणून साजरा केला जातो. समाजसेवा, राजकीय,शिक्षण आणि सहकार,कृषी पाणी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस “सेवा हाच धर्म” या उदात्त भावनेतून विविध उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा रुजली आहे.

जाहिरात

प्रेरणादिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू कुटुंबांना मदत, आरोग्य शिबिरे, रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वितरण, तसेच वृक्षारोपण यांसारखे अनेक समाजोपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचत असून, युवकांमध्ये सेवाभाव आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जाहिरात

यावर्षीही कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात प्रेरणादिन साजरा करण्यात येणार आहे. विविध संस्था, कार्यकर्ते आणि नागरिक या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार असून, सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

जाहिरात

प्रेरणादिनाच्या माध्यमातून स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा सर्वांना मिळत राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

स्व.शंकरराव कोल्हे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे