आपला जिल्हा

पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा- डॉअशोक  गावित्रे       

पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा- डॉअशोक  गावित्रे       
पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा- डॉअशोक  गावित्रे       
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मार्च २०२६- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करिता अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी काढला आहे परंतु आज देखील अनेक पोलीस स्टेशनमध्ये हा कक्ष स्थापन झालेला नसून तो लवकरात लवकर स्थापन करून कार्यरत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी निवेदनाद्वारे अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ  घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी अमोल भारती तसेच कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी व शहराचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याकडे केली आहे

जाहिरात
या निवेदनात म्हटलें आहे की, या कक्षामध्ये पत्रकार ,महिला व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांचा सदस्य म्हणून समावेश करून त्यांच्या नियमित आढावा बैठक व्हाव्यात. यामुळे परिसरातील चालणारे अघोरी प्रकार समोर येऊन त्यांना वेळीच आळा घालता येईल.

जाहिरात
सध्या सगळीकडे ज्योतिषी बाबा ,बुवा आणि राजकारणी, सरकारी अधिकारी ,धनदांडग्या प्रभावशाली व्यक्ती यांची साठ गाठ किती भयानक शोषणकारी असते याचे हादरवून टाकणारे चित्र भोंदू बाबा ज्योतिषी अशोक खरात या प्रकरणातून महाराष्ट्राच्या समोर आले असून अशा जादूटोणा बुवाबाजीला वेळीच पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून कार्यरत करा अशी विनंती डॉ गावीत्रे यानी निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे