आपला जिल्हा

संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये राज्य स्तरीय प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन

संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये राज्य स्तरीय प्रकल्प स्पर्धेचे उद्घाटन

प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना  नवसंशोधनाची संधी   –  देवेंद्र दंडगव्हाळ

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ मार्च २०२६- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने उद्योगाभिमुख अभियंते घडविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असून, विद्यार्थ्यांमधील  कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पना पुढे याव्यात यासाठी प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमधून विध्यार्थ्यांना  त्यांनी आत्मसात केलेली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते, तसेच मंडळाकडून लाखो रुपयांची बक्षिसेही दिली जातात, असे प्रतिपादन महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे उपसचिव  देवेंद्र दंडगव्हाळ यांनी केले.

जाहिरात

    महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळ (एम.एस.बी.टी.ई) प्रायोजीत व संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निक आयोजीत राज्य स्तरीय प्रकल्प स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री दंडगव्हाळ बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले . यावेळी उद्योजक डाॅ. राजेंद्र कावळे, श्री गुरू गोविदसिंग इन्स्टिटयूट ऑफ  इंजिनिअरींग अँड  टेक्नाॅलाॅजी, नांदेडचे डायरेक्टर डाॅ. डाॅ. एम. बी. कोकरे, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्राॅनिक्स अँड  इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी, छ. संभाजीनगरचे शास्त्रज्ञ व इंजिनिअर श्री सौरभ केसरी, प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख व डीन्स व्यसपीठावर उपस्थित होते. या राज्य स्तरीय प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळ, छ. विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध पाॅलीटेक्निक मधिल ३८ टीमने सहभाग नोंदविला. एम.एस.बी.टी.ई . मार्फत प्रथम प्रकल्प विजेत्या टीमला रू १ लाखाचे व द्वीतिय विजेत्या टीमला रू ५० हजारांचे बक्षिस होते.
प्रारंभी प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी शैक्षणिक  संकुलातील विविध संस्थांच्या प्रगतीचा चढता आलेख सांगत संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांनी घालुन दिलेल्या शैक्षणिक आचारसंहितेनुसार व संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा काल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध संस्थांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुद्धा  यशाला गवसणी घातल्याचे नमुद केले.

जाहिरात

यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना  संबोधित करताना डाॅ. कावळे म्हणाले की आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी  नसुन योग्य स्किल सेट असणे अत्यावश्यक  आहे. कौशल्यांशिवाय  नोकरीच्या संधी मर्यादित होतात. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. डाॅ. कोकरे म्हणाले की नवीन तंत्रज्ञान अवगत करत असताना आपले फिजिकल फिटनेस योग्य राहण्यासाठी रोज व्यायाम करा. श्री केसरी म्हणाले की नाविन्यपुर्ण कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रूपांतरीत करणे ही काळाजी गरज असुन यासाठी हॅन्डस्  ऑन ट्रेनिंग  अत्यंत महत्वाची भूमिका बजावते.

जाहिरात

अध्यक्ष स्थानावरून बोलताना  अमित कोल्हे यांनी सांगितले की, प्रोजेक्ट स्पर्धांच्या माध्यमातून विध्यार्थ्यानी  नवकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिकणे अत्यंत आवश्यक आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामागे एमएसबीटीईचा दूरदृष्टीपूर्ण उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये  संशोधनाची व नवोन्मेशाची  वृत्ती विकसित करणे हा त्याचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धांमधून मिळणारे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांचा  रिझ्युम अधिक भक्कम बनवून त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, विद्यार्थ्यांनीही  देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असे प्रकल्प विकसित करावेत, असे त्यांनी आवाहन केले. येणारा काळ हा संधींनी भरलेला असून, योग्य कौशल्ये आणि नवकल्पनांच्या जोरावर विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. प्रकल्प स्पर्धेचे समन्वयक प्रा. योगेश  जगताप यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. संदीप पाटील यांनी आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे