आपला जिल्हा

थोरात कारखान्यावर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

थोरात कारखान्यावर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

३५१ महिलांचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभाग

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २५ जुलै २०२५- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये ४० व्या अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली असून या सप्ताहामध्ये ३५१ महिलांनी ज्ञानेश्वरी पारायण मध्ये सहभाग घेतला आहे.

जाहिरात

अमृत सांस्कृतिक मंडळ व कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.प्रतिभाताई पांडुरंग घुले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी हरिभक्त परायण करंजकर महाराज, हरिभक्त परायण चंद्रलेखाताई काकडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, नानासाहेब दिघे, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, नवनाथ गडाख, भारत देशमुख, आदींसह विविध पदाधिकारी व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना पांडुरंग घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराला अध्यात्माची जोड दिली. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला. प्रवरा नदीचा उगम असलेल्या अमृतेश्वराचे मंदिर या ठिकाणी उभे केले. गेली ४० वर्षे या परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असून महिलांचा सहभाग मोठा राहिला आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम वारकरी संप्रदायाचे विचार जोपासले आहे. हा सहकाराचा आदर्श पॅटर्न देशासाठी दिशादर्शक असून सर्वांना जीवनात आनंदी होण्यासाठी अध्यात्म गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

तर जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा सप्ताह होत असून महिलांचा मोठा सहभाग राहत आहे.ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये यावर्षी ३५१ महिलांचा सहभाग असून अध्यात्माने जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. ही परंपरा आपल्याला कायम ठेवायचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी करंजेकर महाराज,चंद्रलेखाताई काकडे,रामदास तांबडे यांनीही मनोगत व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे