Kopargaon vijay kapse दि ९ एप्रिल २०२६– थोर साधुसंतांच्या पावन भूमीत सरला बेटचे मताधिपती प.पू रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे करंजी, पढेगाव, ओगदी, आंचलगाव, शिंगणापूर, बोलकी, खिर्डी गणेश आदी गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दि १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जाहिरात
याप्रसंगी श्री संत जनार्दन स्वामी आश्रम बेट कोपरगाव चे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, कुंभारी आश्रमाचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, लासलगाव अनाथ आश्रमाचे वासुदेवनंदगिरीजी बहुरूपी महाराज,नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णा घरोटे आदीचे मार्गदर्शन लाभणार आहे.जाहिरात
तर या प्रसंगी ह.भ.प सुभाष महाराज भिंगारे, ह.भ. प भानुदास महाराज रोहम, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज फापाळे, ह.भ.प योगेश महाराज करंजीकर, ह.भ.प संगीताताई करंजीकर, ह.भ.प निलेश महाराज चव्हाण, ह.भ.प सुभाष महाराज जगताप, ह.भ.प सुभाष महाराज जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी जास्तीत जास्त सकल हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.जाहिरात