आपला जिल्हा

संजीवनीच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनीच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड

 ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या कामगिरीने संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत आघाडीवर

जाहिरात

kopargaon vijay kapse दि ९ एप्रिल २०२६: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची बिझिनेस नेक्स्ट कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. या कंपनीने या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेज देऊ केले. एआय आधारीत सॉफ्टवेअर सोल्युशन्स पुरविणारी ही  कंपनी नोएडा येथील आहे.  तिचे कार्यक्षेत्र युएसए, कॅनडा, सिंगापुर, अशा विवीध ठिकाणी विस्तारलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम सत्राची परीक्षा अद्याप द्यायची आहे. त्यापूर्वीच त्यांच्या  हाती नोकरीची आर्डर मिळाली. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीने संजीवनीचे विद्यार्थी नोकरीत कायम आघाडीवर असल्याचे वास्तव समोर येत आहे.

जाहिरात

     या विद्यार्थ्यांत कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या  अश्विनी  नितिन मुंगसे, धनश्री जगदीश शहाणे, समृध्दी महेंद्र बोरावके, इन्फर्मेशन टेक्नांलॉजीच्या अथर्व संजय भवर, शताक्षी सतिष भुसारी, हर्षल  उमेश  पाटील, प्रज्वल राजस सरोदे, श्रेयश  चंद्रशेखर तळेकर व जयेश  संजय थेटे यांचा समावेश आहे. संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग औद्योगिक जगतासोबत समन्वय ठेवतो. त्यानुसार विद्यार्थ्यांना अतिरीक्त प्रशिक्षण दिले जाते. विविध कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी येथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विविध नामांकित कंपन्यांना हव्या असलेल्या कुशल अभियंत्यांची जडणघडण संजीवनीत केली जाते. त्यामुळे परिक्षेपूर्वीच नोकरी हे समिकरण आकाराला आले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दरवर्षी मोठ्या  संख्येने विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या   संधी उपलब्ध होत आहेत.

जाहिरात

   संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी व त्यांचे पालक  तसेच महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन व त्यांची टीम यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
कॉलेज


माझ्या भावाचे करिअर संजीवनीतच घडले. त्यामुळे मी निशंक मनाने संजीवनीत प्रवेश घेतला. आज माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. चांगल्या कंपनीत चांगल्या पगारीची नोकरी परिक्षेच्या निकालापूर्वीच मिळाली. मला संजीवनीत ‘स्मार्ट पाथहोल डिटेक्शन  सिस्टिम युझिंग एआयएमएल’ हा प्रोजक्ट करण्याची संधी मिळाली. त्यामुळे  एआयशी  निगडीत असलेल्या या कंपनीत मला नोकरीची संधी मिळणे सोपे झाले. ट्रेनींग प्लेसमेंट विभागाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतली. या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणून आज आमच्या करिअरला चांगली सुरवात झाली. – धनश्री शहाणे, विद्यार्थिनी.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे