आपला जिल्हा

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे – मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे – मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनी संस्थेत नेतृत्व विकास शिबिर संपन्न
जाहिरात

Sangmner vijay kapse दि ११ एप्रिल २०२६-

 आजचे युग हे आधुनिक व तंत्रज्ञानाचे युग आहे .विद्यार्थ्यांना आपली प्रगती व विकास करण्यासाठी अनेक नवनवीन पर्याय खुले आहे. एआय सह सर्व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती करावी असे आवाहन माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

   अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय नेतृत्व विकास कार्यक्रम शिबिरात ते बोलत होते. यावेळी समवेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे, उद्योजक व आरोह न्यूट्रीचेम  प्रा ली चे संस्थापक डॉ. रोहित दुबे पाटील, सौ कविता डुबे पाटील, शैक्षणिक उद्योजक डॉ प्रतिमा खंडेलवाल, तसेच अमृतवाहिनी संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही बी धुमाळ, डॉ जे बी गुरव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

     
यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने कायम आपली गुणवत्ता जपली आहे. अगदी देश विदेशात या संस्थेचे विद्यार्थी मोठ्या पदावर असून त्यांनी खऱ्या अर्थाने या संस्थेचे नाव उज्वल केले आहे. आधुनिक युगातील नेतृत्वात तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे , विविध बदल स्वीकारणे हे अत्यंत आवश्यक असून आजच्या जागतिक स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी अद्ययावत राहणे ,नवनवीन कल्पनांचा स्वीकार करणे गरजेचे आहे.   अद्ययावत सनसाधनांद्वारे विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जाहिरात

 
     यावेळी डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्था देश पातळीवर गुणवत्तेच्या बाबतीत अग्रमानांकित आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथे सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्थेच्या वतीने आयोजित पाच दिवसीय नेतृत्व विकास कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

    पाच दिवसीय असणाऱ्या या नेतृत्व विकास कार्यक्रमात डॉ.प्रतिमा खंडेलवाल यांनी सहानुभूती सक्रिय श्रवण आणि सहयोग या गुणांना प्रभावी नेतृत्वाने मुख्य आधारस्तंभ कसे बनवावे, व विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवून गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.

       उद्योजक व आरोह न्यूट्रीचेम चे  संस्थापक डॉ. रोहित दुबे पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी एक दिवसीय शिबिरामध्ये नवस संकल्पना ब्रँडिंग ,संरचना आणि कौशल्य या मॉडेलच्या माध्यमातून नेतृत्व विकासाची संकल्पना स्पष्ट केली आणि सातत्य ,शिस्त प्रयत्नशीलता व सकारात्मक दृष्टिकोन यावर भर देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 
     कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महाविद्यालयाच्या व शाळा च्या प्राचार्यांनी कृती आराखडा सादर करून त्यावर अभिप्राय घेण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींना प्रमाणपत्राची वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ वृषाली साबळे आणि डॉ सचिन खर्डे यांनी विशेष प्रयत्न केले.

   या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ जे बी गुरव यांनी केली. यावेळी प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, डॉ मच्छिंद्र चव्हाण ,डॉ मनोज शिरभाते, डॉ बी एम. लोंढे, सौ जे बी सेठी, डॉ राजेंद्र वाघ,विलास भाटे,आशिष कुमार ,अंजली कन्नावार, प्रा.जी.बी काळे , स्नेहल शेकदार, पराग अग्रवाल यांच्यासह विविध विभाग प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे