आपला जिल्हा

आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार

आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार
आत्मा मालिकला राज्यस्तरीय विज्ञान जथ्था पुरस्कार
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १७ एप्रिल २०२६ : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यालयास दिला जाणारा राज्यस्तरीय ‘विज्ञान जथ्था’ पुरस्काराने आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलला सन्मानित करण्यात आले.
आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुल सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात प्रथम स्थानावर आहे. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये गुरुकुलाचे २६ विदयार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली. त्यामध्ये कृष्णा लोखंडे, श्लोक कदम सुवर्णपदकासह राज्यात प्रथम, आरव नाणेकर, राम जाधव, श्रेयश भवर रौप्य पदकासह राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला.

जाहिरात

मुंबईतील यशवंतराव नाट्यमंदिरामध्ये डॉ. अशोक नगरकर यांच्या हस्ते सेमी इंग्लिश मिडीयम गुरुकुलास विज्ञान जथ्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मधुबाला चिंचाळकर, अच्युतराव माने, आत्मा मालिकचे प्राचार्य निरंजन डांगे, विभागप्रमुख सचिन डांगे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश आहे. याअंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तयारी शिबीराचे आयोजन, नैदानिक चाचण्या, सराव परीक्षा, तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले असे मत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी व्यक्त केले.

विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख सचिन डांगे, पर्यवेक्षक  गणेश रासने, अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी, शिक्षक प्रियांशू कुमार, हरीश तेली, गौरव कापडणीस, अभिलाषा उन्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्षे, श्रीम मिरा पटेल मॅडम आदींनी अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे