आपला जिल्हा

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या बारा विद्यार्थ्यांंची स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या बारा विद्यार्थ्यांंची स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी करतेय पालकांची स्वप्नपूर्ती

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ मे २०२६संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्लेसमेंटच्या विश्वासार्हतेची पून्हा प्रचिती आली. एकाचवेळी बारा विद्यार्थ्यांची स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. अशा प्रकारे संजीवनी पालकांची स्वप्नपूर्ती करीत आहे. या महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग सातत्याने विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क ठेवून असतो. त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थी घडवीण्यावर भर असतो. विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात पुढाकार घेतो. या प्रयत्नांना यश मिळत आहे. नुकतेच स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीमार्फत बारा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड होणे हे महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे द्योतक आहे.

जाहिरात

स्कॅटरपाय अनॅलिटीक्स प्रा. लिमिटेड या डेटा अनॅलिटीक्स कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या पायल बाबासाहेब बोर्डे, खुशी मिलींद गुरवे, अथर्व महेश काळे, प्रसाद बबन परजणे, क्रिष्णा रामदास शेलार, सिद्धांत विजय ठोंबरे , श्रुष्टि नितिन वाघमारे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पुजा विकास खळेकर, सुशांत उदय नाईक, ऋतुजा योगेश ठोंबरे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या यशोदीप शरदकुमार फसळे व प्रथमेश सुरेश जाधव यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली.

जाहिरात

‘संजीवनीमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरीची हमी’ हे समीकरण दिवसेंदिवस अधिक दृढ होते आहे. संस्थेचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले . तर कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात

संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज हे उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर देते. अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, नियमित औद्योगिक भेटी, तसेच सॉफ्ट स्किल्स आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण यामुळे येथे शिकणारे विद्यार्थी प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील गरजांनुसार सक्षम बनतात. परिणामी, विविध नामांकित कंपन्यांच्या कठोर निवड प्रक्रियेत हे विद्यार्थी यशस्वीपणे उतरतात. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतात.

अमित कोल्हे (कार्यकारी विश्वस्त संजीवनी शैक्षणिक संकूल)

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्कॅटरपाय अनॅलिटीक्स कंपनीने नोकरीसाठी निवड केल्याबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे