के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश

के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश
के. जे. सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश

Kopargaon vijay kapse दि ५ मे २०२६–के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळविल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली आहे. महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील गणित विभागाचा विद्यार्थी प्रफुल्ल कुमावत याची विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली असून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाची विद्यार्थिनी स्नेहल आहेर हिची कर सहाय्यक (जी. एस. टी.) या पदावर निवड झाली आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करत आहे.

महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून यासाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने ध्येयपूर्ती अकॅडमीची स्थापना केलेली आहे. यावर्षी अकॅडमीच्या माध्यमातून आठ विद्यार्थी पोलिस बनले. तसेच दोन विद्यार्थी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स मध्ये निवडले आहेत. यामध्ये विभागांतर्गत मयूर घोलप (ठाणे पोलीस) मुस्तकीन पिरजादे (मुंबई कारागृह पोलीस), फरदीन शेख (बुलढाणा पोलीस), अबूजर शेख (मीरा भाईंदर पोलिस) स्वाती डोंगरे, मेघा वाघमारे (बीड पोलीस), आरती जगताप (छत्रपती संभाजीनगर पोलीस) आणि प्रियंका गवळी (पुणे पोलीस) यांची महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झाली. तसेच महाविद्यालयातील कांचन वाघमारे, मोनाली कालेकर या विद्यार्थिनीची महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स (MSF) यामध्ये निवड झाली असल्याची माहिती ध्येयपूर्ती अकॅडमीचे संचालक डॉ. सुनील कुटे व प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




