साने गुरुजी जीवन गौरव पुरस्काराने मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांचा पुणे येथील शानदार कार्यक्रमात गौरव

साने गुरुजी जीवन गौरव पुरस्काराने मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांचा पुणे येथील शानदार कार्यक्रमात गौरव


यावेळी बोलताना मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, लहानपणापासूनच आमच्या घरात पुरोगामी विचारांचे वातावरण होते. मामांकडे असताना महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तक वाचले आणि त्यांच्या विचारांप्रती आकर्षण निर्माण झाले. मोठे वैचारिक परिवर्तन होण्यामध्ये येथून सुरुवात झाली लहानपणी आम्ही संगमनेर येथील रंगार गल्लीमध्ये राहत असायचो. त्यावेळी अनेक मोठ्या नेत्यांचा सहवासाला लाभला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, बी.जे.खताळ पाटील, भास्करराव दुर्वे नाना यांचा सहवास लाभला व त्यांना पाहत आलो.

फर्ग्युसन कॉलेज येथे शिकत असताना पुणे येथील साने गुरुजी प्रतिष्ठानला भेट द्यायचो. यावेळी ही वैचारिक चर्चा आमच्या व्हायच्या. संगमनेर मध्ये एम एस सर्जन असताना चांगली प्रॅक्टिस सुरू होती. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श संस्कार आमच्यावर झाले. शिस्त प्रामाणिकपणा त्यांनी आयुष्यभर जोपासली कधीही राजकारणासाठी तत्वांशी तडजोड केली नाही. काँग्रेसचा सहकाराचा विधायक मार्ग त्यांनी आयुष्यभर जपला.

पुढे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही हे व्रत कायम ठेवले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही अत्यंत अडचणीच्या काळातही कधीही विचार सोडले नाही. ते विचारधारेशी कायम पक्के आहेत. माझे विचार स्पष्ट आणि प्रामाणिक आहे मी पुरोगामी विचारांचा पक्का कार्यकर्ता आहे. प्रतिगामी विचारांचे लोक भेटले तर चर्चा करण्यावर माझा भर असतो. लोकशाही मानणारा राज्यघटनेचा विचार घेऊन तरुणांच्या माध्यमातून विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी आपले काम सुरू आहे. यापुढील काळातही हा राष्ट्र विचार पुढे नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर प्रा.कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात राहून अत्यंत साधेपणा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे व्यक्तिमत्व सर्वांना नेहमी भावते. विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास हा तरुणांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणारा असतो असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ.शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार कपिल पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी प्रा.हिरालाल पगडाल, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेर मधील राष्ट्रसेवा दल व छात्र भारतीचे आणि जयहिंद युवा मंच विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांना मिळालेला या जीवनगौरव पुरस्कार बद्दल मा.महसूल व शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, हिरालाल पगडाल, रामहरी कातोरे,हौशीराम सोनवणे,सोमेश्वर दिवटे, नूर मोहम्मद शेख, अजय फटांगरे निखिल पापडेजा, सौ.अर्चनाताई बालवडे, सौ.प्रमिलाताई अभंग, विश्वासराव मुर्तडक यांच्यासह संगमनेर मधील विविध पदाधिकारी कार्यकर्ते व उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार,आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




