आपला जिल्हा

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला यश,घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २३ जुन २०२६कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मागर्दर्शनाखाली सोमवार (दि.२२) पासून कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याठिकाणी सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरात

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी (मालमत्ता कर) आकारण्यात येवून मालमत्ताधारकांना अधिकृत पावत्या देखील वाटप करण्यात आल्या होत्या. केलेली वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हि अवाजवी केलेली वाढ कोपरगावकरांच्या खिशाला अजिबात परवडणारी नव्हती त्यामुळे नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु या चुकीच्या घरपट्टी (मालमत्ता कर) वाढी संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आवाज उठवून हि करवाढ मागे घ्यावी अशी लेखी मागणी केली होती. मालमत्तांचे वर्गीकरणनिर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार होवून या करवाढीबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो हरकती नोदाविल्या होत्या.

जाहिरात

त्यामुळे कोपरगावकरांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सुरु करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी हजारो कोपरगावकरांसह विविध संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता. सलग दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती राहिल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली असतांना कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवालकर विभागाचे अधिकारी धुमाळ यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नगरपरिषदेकडून मान्य केल्या. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय होत नाही तोपर्यंत घरपट्टी वाढीला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धरणे आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले. सर्वसाधारण सभेत घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असून तोपर्यंत नागरिकांना वाढीव घरपट्टीच्या पावत्या वितरित केल्या जाणार नाहीत असे असले तरी नागरिकांच्या हितासाठी ही आवाजवी घरपट्टी वाढ रद्द किंवा स्थगित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सभागृहात ठामपणे पाठपुरावा करणार असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे