आपला जिल्हा

रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त

रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त

रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनी सुवर्णा शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ मे २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालय, कोपरगाव येथील रसायनशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी सुवर्णा देविदास शिंदे यांनी “Application of Ionic Liquids in Synthesis of Oxygen and Nitrogen Heterocycles” या विषयावरील संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

जाहिरात

या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रो. डॉ. मोहन सांगळे व डॉ. विलास गाडे यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन प्रबंधाच्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सुरेश गायकवाड यांनी बाह्य परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सतीश परदेशी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

जाहिरात

सदर मौखिक परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, डॉ. घनश्याम भगत, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ.निलेश मालपुरे,महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतिभा रांधवणे तसेच कार्यालय अधीक्षक  सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

सुवर्णा शिंदे यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य,  चैताली काळे,  आमदार विवेक कोल्हे,  सुनील गंगुले,  बाळासाहेब आव्हाड यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

कॉलेज

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे