स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे बलिदान नव्या तरुणाईला प्रेरणादायी ठरावे- सह सेक्रेटरी चासकर
स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे बलिदान नव्या तरुणाईला प्रेरणादायी ठरावे- सह सेक्रेटरी चासकर
सह्याद्री महाविद्यालयाच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी दि १५ ऑगस्ट २०२४– संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री प्राथमिक विभाग, माध्यमिक विद्यालय , ज्युनिअर कॉलेज आणि वरिष्ठ सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय येथे ७८ वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सह्याद्री शिक्षण संस्थेचे सहसेक्रेटरी श्री. दत्तात्रय चासकर यांच्या शुभहस्ते तर संस्थेचे रजिस्ट्रार बी. आर. गवांदे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री के. जी. खेमनर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील , प्राथमिक विभागाच्या श्रीमती नम्रता पवार मॅडम, आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी सहसेक्रेटरी श्री दत्तात्रय चासकर यांनी आपल्या अभिभाषणात स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्ञात अज्ञात देशभक्तांच्या आठवणी जाग्या करत क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करून, त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्वांनी आपल्या क्षेत्रातील कार्यदेश सेवेसाठी करावे असे आवाहन केले.
वरिष्ठ महाविद्यालयाच्या एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन सुंदर परेड सादर केली. प्राथमिक विभाग व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर गीते सादर केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉलेजचे क्रीडाशिक्षक प्रा. भारत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य संजय सुरसे , उपप्राचार्य बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य विलास कोल्हे, सह्याद्री विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डोके सर पर्यवेक्षक तुरकणे सर, श्रीमती रणशूर , माजी प्राचार्य एम. वाय दिघे, माजी प्राचार्य के. इ. दिघे, एन.सी.सी. ऑफिसर प्रा. जोरवर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ व प्रा. नवनाथ गुंड यांनी केले तर आभार उपप्राचार्य संजय सुरसे यांनी केले.