आपला जिल्हा

तिडके पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; उत्तर विभागात शाखेचा तिसरा क्रमांक

तिडके पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; उत्तर विभागात शाखेचा तिसरा क्रमांक

तिडके पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; उत्तर विभागात शाखेचा तिसरा क्रमांक

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ जुलै २०२६महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी, शैक्षणिक वर्ष २०२५–२६) मध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात शाखेचा तिसरा क्रमांक मिळविला आहे. या परीक्षेस विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थी पात्र ठरले असून ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला आहे.

जाहिरात

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

  • समिक्षा शिवाजी शिंदे – २४८ गुण
  • कार्तिकी प्रकाश भोसले – २४६ गुण
  • आदिती सिद्धार्थ पगारे – २४० गुण
  • श्रद्धा चंद्रकांत गाडे – २४० गुण
  • ईश्वरी चैतन्य सोनवणे – २३६ गुण
  • समर्थ सचिन काशिद – २३२ गुण
  • अर्णव हेमंतकुमार चौधरी – २३२ गुण
  • स्वरूप सतीश सानप – २२८ गुण
  • श्याम पुरुषोत्तम देव्हाडराव – २२८ गुण
  • रुद्र प्रेमनाथ सोनावणे – २२८ गुण
  • सत्यम राजेंद्र सानप – २२८ गुण

या अभूतपूर्व यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, माता-पालक व शिक्षक-पालक संघ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच विद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

जाहिरात

या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक दवंगे एस. यू., पर्यवेक्षक निलकंठ पी. ए., विभागप्रमुख कदम एन. आर., ज्येष्ठ शिक्षक मोरे आर. के., राऊत एस. एल., गोपाळे एस. के., लांडगे व्ही. एस. तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे