कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा; धांदरफळ परिसरातील कार्यकर्त्यांचे निवेदन: मंगळवारी रास्ता रोको चा इशारा

कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा; धांदरफळ परिसरातील कार्यकर्त्यांचे निवेदन: मंगळवारी रास्ता रोको चा इशारा


या निवेदनात म्हटले आहे की कोल्हार घोटी राज्यमार्गाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. डांबरीकरणाचा वरचा थर हा अत्यंत पातळ असून यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे याचबरोबर सातत्याने धूळ उडत आहे. या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थी, नागरिक महिला व युवक यांना या धुळीचा मोठा त्रास होत आहे. हे काम अत्यंत चुकीचे आणि निकृष्ट झाली असून तातडीने या कामाची दुरुस्ती व्हावी याचबरोबर या निकृष्ट कामाची शासकीय स्तरावरून तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याचबरोबर संगमनेर तालुक्यामध्ये सध्या टक्केवारी जोरात वाढली असून यामुळे असे रस्ते खराब होत असल्याची टीका दत्ता कोकणे यांनी केली असून या कामाच्या निषेधार्थ उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी नऊ वाजता सातवा मैल या ठिकाणी परिसरातील नागरिकांसह भव्य रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या कामाची तातडीने दुरुस्ती व चौकशी न झाल्यास या पुढील काळात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.



