आपला जिल्हा

रस्ता रखडला, ग्रामस्थ संतापले! ओगदी–करंजी रस्त्यासाठी २० जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

रस्ता रखडला, ग्रामस्थ संतापले! ओगदी–करंजी रस्त्यासाठी २० जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

रस्ता रखडला, ग्रामस्थ संतापले! ओगदी–करंजी रस्त्यासाठी २० जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १५ जुलै २०२६:  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ओगदी ते करंजी बु. या ३.४०० किलोमीटर रस्त्याचे काम भूमिपूजनानंतरही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम पूर्णपणे रखडले असून मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेले काम तात्काळ सुरू करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, कामातील विलंबास जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून करंजी बु. येथील मारुती मंदिरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गावातील युवकांनी तहसीलदार यांना निवेदन देत दिला आहे.

जाहिरात

या रस्त्याचे भूमिपूजन ९ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले होते. माहिती फलकानुसार काम पूर्ण करण्याची मुदत ८ ऑक्टोबर २०२६ असली तरी प्रत्यक्षात काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप गणेश  भिंगारे, अजय भिंगारे, आप्पासाहेब भिंगारे, ज्ञानेश्वर आगवण, संजय शिंदे, भाऊसाहेब  कदम, बाळू  आगवन, चांदभाई पठाण, संदीप कापसे, लक्ष्मण भिंगारे दत्तात्रेय भाऊसाहेब आगवण  आदीनी करत उपोषणाचा इशारा निवेदन देत केला आहे.

जाहिरात

निवेदनात म्हटले आहे की,या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच हजारो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रशासन दुर्लक्ष करत आहे.ग्रामस्थांनी रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, सर्व खड्डे तात्काळ बुजविणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि काम पूर्ण होण्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पोलिस निरीक्षक यांना निवेदन देताना

मागण्या मान्य न झाल्यास २० जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच या आंदोलनादरम्यान किंवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भविष्यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे