आपला जिल्हा

स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीच्या शासकीय सवलतींचा लाभ घ्या-आमदार आशुतोष काळे

 स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीच्या शासकीय सवलतींचा लाभ घ्या-आमदार आशुतोष काळे

स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीच्या शासकीय सवलतींचा लाभ घ्या-आमदार आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ जुलै २०२६ :-  सर्वसामान्य नागरिकांचा एसटी महामंडळाच्या बसमधील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि डिजिटल करण्याबरोबरच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र प्रवाशांपर्यंत थेट पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच इतर पात्र लाभार्थींना शासकीय सवलतींचा लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळणार असून, कोपरगाव मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी १ ऑगस्टपूर्वी हे स्मार्ट कार्ड काढून घ्यावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

सुरेगाव (कोळपेवाडी) बसस्थानक येथे राज्य परिवहन महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्डचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, महायुती शासनाच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डद्वारे महिलांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थींनाही नियमानुसार प्रवास सवलतीचा लाभ मिळणार आहे.

जाहिरात

या सर्व योजनांचा अखंडित लाभ मिळण्यासाठी पात्र नागरिकांनी १ ऑगस्टपूर्वी आपल्या जवळच्या एसटी आगारात किंवा अधिकृत ऑनलाइन प्रणालीद्वारे एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे. स्मार्ट कार्डसाठी आधार कार्ड, वयाचा अधिकृत पुरावा, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास), विद्यार्थ्यांसाठी सरल क्रमांक आणि चालू मोबाईल क्रमांक आवश्यक असल्याचेही आमदार काळे यांनी सांगितले.एनसीएमसी स्मार्ट कार्डचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना तिकीटासाठी रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. मोबाईलप्रमाणेच हे कार्ड रिचार्ज करून कॅशलेस पद्धतीने तिकीट काढता येणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आधुनिक होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि शासनाच्या विविध सवलतींचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी वेळेत आपल्या जवळच्या एसटी आगारात जाऊन अथवा ऑनलाइन पद्धतीने एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, अंबादास धनगर, सुनिल कोळपे, महेश  कोळपे, मोतीराम निकम, ओंकार बिडगर, प्रकाश नवघरे, राजेंद्र कोळेकर, चव्हाण साहेब, दिलीप कोळपे, अनिल बनकर, स्थानक प्रमुख प्रकाश हिरे आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे