आपला जिल्हा

कोणार्क सूर्य मंदिराच्या भेटीतून भारताच्या गौरवशाली वारशाचा अनुभव : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कोणार्क सूर्य मंदिराच्या भेटीतून भारताच्या गौरवशाली वारशाचा अनुभव : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कोणार्क सूर्य मंदिराच्या भेटीतून भारताच्या गौरवशाली वारशाचा अनुभव : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

Sangmmer vijay kapse दि १७ जुलै २०२६ : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ओडिशा राज्यातील पुरी जिल्ह्यात वसलेल्या जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराला भेट देत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अभिवादन केले.

जाहिरात

यावेळी त्यांनी मंदिराच्या अद्वितीय वास्तुकलेची, अप्रतिम शिल्पकलेची आणि ऐतिहासिक वैभवाची पाहणी केली. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त असलेले कोणार्क सूर्य मंदिर हे भारतीय स्थापत्यकलेचा सर्वोत्तम नमुना असून, त्याची कलात्मक भव्यता आणि सांस्कृतिक महत्त्व संपूर्ण जगाला आकर्षित करणारे आहे.

जाहिरात

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, भारताचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि तत्कालीन स्थापत्यकौशल्याची साक्ष देणारे कोणार्क सूर्य मंदिर हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.

जाहिरात

कोणार्क सूर्य मंदिराला दिलेली ही भेट अत्यंत प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे